Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubman Gill Photo : इंग्लंडच्या भूमीत इतिहास रचणाऱ्या शुभमन गिलची कमाई माहिती किती आहे का? ‘या’ महागड्या गाड्यांचा आहे चाहता.. 

 भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिका खेळली जात आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या गिलने ३८७ चेंडूंचा सामना करत २६९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३० चौकार आणि ३ षटकार लगावलेया आहेत. या कामगिरीसह त्याने अनेक विक्रम देखील रचले आहेत.  भारताचा युवा कर्णधार  शुभमन गिल कमाईच्या बाबतीत देखील उजवा आहे.  सध्या त्याची कमाई गगनाला भिडणारी अशी आहे. मैदानावर धावांचा रतीब घालणारा बड्या बड्या महागड्या गाड्यांचा देखील शौकीन आहे, तसेच पंजाबमधील फिरोजपूरमध्ये त्याचे आलिशान घर देखील आहे. या भारतीय  कर्णधाराची नेमकी कमाई किती याबाबत आपण जाणून घेऊया.(फोटो-सोशल मीडिया)

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 04, 2025 | 05:19 PM

Shubman Gill Photo: What is the income of Shubman Gill, who created history in England? He is a fan of 'these' expensive cars..

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅममध्ये दुसऱ्या कसोटीत  शानदार द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. द्विशतक ठोकणारा तो सहावा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या शानदार खेळीच्या मदतीने भारताने इंग्लंडमध्ये चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. 

2 / 6

इंग्लंडमध्ये धावांचा रातीब घालणारा शुभमन गिल कमाईच्या बाबतीत देखील चांगलाच पुढे आहे. या युवा खेळाडूने अल्पावधीतच चांगली कमाई केली आहे. गिलची सध्याची एकूण संपत्ती सुमारे ३४ कोटी रुपये असून त्याने क्रिकेट व्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीग करार आणि जाहिरातींमधून देखील कमाई केली आहे. 

3 / 6

भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिल दरमहा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो. या व्यतिरिक्त तो वर्षाला ४ ते ७ कोटी रुपयांची कमाई करत असतो. गिलचा बीसीसीआयच्या ग्रेड-ए करारात समावेश असून त्याला वार्षिक ७ कोटी रुपये पगार मिळतो. त्याला सामने खेळण्यासाठी वेगळे पैसे देखील मिळतया असतात.

4 / 6

शुभमन गिलला आयपीएलमधून देखील दर हंगामात १६.५ कोटी रुपये मिळत असतात. इतकेच नाही तर तो अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये देखील दिसून येत असतो. त्यामुळे त्याच्या कमाईमध्ये सतत वाढ होत आहे. जाहिरातींमधून गिल दरवर्षी २ ते ३ कोटी रुपयांची कमाई करत असतो.

5 / 6

कसोटी कर्णधार शुभमन गिलचे पंजाबमधील फिरोजपूर येथे एक आलिशान घर असून त्या घराची किंमत सुमारे ३.२ कोटी रुपये आहे. गिलकडे अनेक आलिशान वाहने आहेत. यामध्ये रेंज रोव्हर वेलार, मर्सिडीज बेंझ ई३५० आणि महिंद्रा थार या वाहनांचा समावेश आहे. महिंद्रा थार त्याला आनंद महिंद्रा यांच्याकडून भेट देण्यात आली आहे.  दिली होती.

6 / 6

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक करणारा गिल हा ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांच्यानंतर कसोटीत द्विशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा जगातील तिसरा खेळाडू बनला आहे.

Web Title: What is the earnings of shubman gill who created history in england photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?
1

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या
2

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
3

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
4

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.