
india Beat New Zealand
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज खेळला गेला. हा सामना ऑकलंड येथील ईडन पार्क स्टेडियमवर रंगला. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ ५० षटकेही मैदानावर टिकू करु शकला नाही. संपूर्ण संघ ४०.२ षटकांत १८५ धावांवर बाद झाला. परंतु, पावसामुळे टारगेटमध्ये बदल करण्यात आला. नवीन टारगेटनुसार भारताला आता ३२ षटकांत १४३ धावांची गरज होती.धावांचा पाठलाग करताना , टीम इंडियाने २२.४ षटकांत ५ विकेट्स गमावून सहज लक्ष्य गाठले. भारताने हा सामना ५ विकेट्सने जिंकला. विराट कोहलीने ताबडतोब फलंदाजी करत ५१ चेंडूमध्ये ७४ धावांची खेळी केली.
दोन्ही संघांची प्लेइंग ११
भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.