Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोहली-धोनीच्या शेवटच्या आयपीएल लढतीत पाऊस खलनायक ठरेल का? RCB vs CSK सामना वाया गेला तर…

आज सासक विरुद्ध RCB ५२ वा सामना आज म्हणजे शनिवार, ३ मे रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यादरम्यान पाऊस खेळ खराब करू शकतो.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 03, 2025 | 10:34 AM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

RCB vs CSK हवामानाचा अहवाल : आजच्या सामन्यात विराट कोहली आणि एमएस धोनी आमनेसामने असणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाच्या या सीझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे, संघाने या सीझनमध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करू शकते. आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ५२ वा सामना आज म्हणजे शनिवार, ३ मे रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आरसीबी विरुद्ध सीएसके सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.

चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु कोहली आणि धोनी यांच्यातील हा आयपीएलमधील शेवटचा सामना असू शकतो असे समजून चाहते थोडे भावनिक झाले आहेत. खरंतर, धोनीच्या आयपीएल निवृत्तीबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. या सीझनमध्ये संघाची कामगिरी पाहता असे दिसते की आता धोनी या रंगीत लीगला निरोप देईल. तथापि, आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यादरम्यान पाऊस खेळ खराब करू शकतो.

RCB vs CSK Playing 11 : बंगळुरूच्या नशिबी पहिले स्थान असणार का? जाणून घ्या आजच्या सामन्यात कशी असेल संघाची प्लेइंग 11

बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामन्यात हवामानाचा अहवाल

गेल्या २-३ दिवसांपासून बेंगळुरूमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे, ज्यामुळे तिथे राहणारे लोक आज पाऊस पडेल की नाही याबद्दल गोंधळलेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगळुरूमध्ये दुपारी किंवा संध्याकाळी पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बेंगळुरूमधील हवामानाबाबत पिवळा इशारा देखील जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी बेंगळुरूसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. अ‍ॅक्युवेदरच्या मते, सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यात संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. याचा अर्थ षटकांमध्ये कपात होऊ शकते. चिन्नास्वामीची ड्रेनेज सिस्टीम चांगली आहे, जर पाऊस वेळेवर थांबला तर चाहत्यांना सामन्याचे किमान ५-५ षटके नक्कीच पाहायला मिळतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्लेइंग 11 –

फिल सॉल्ट/जेकब बेथेल, विराट कोहली , देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवूड, सुयश शर्मा, सुयश शर्मा

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग 11 –

शेख रशीद, आयुष माटे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा , डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मथेश पाथिराना, नूर अहमद, खलील अहमद, अन्सुल कंबोज

Web Title: What will be the weather report for today rcb vs csk match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 10:08 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • MS. Dhoni
  • RCB vs CSK
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
1

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
2

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

Virat Kohli: प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी घेतले 5 कोटी? आरोपांनंतर विराट कोहलीच्या टीमचं सडेतोड उत्तर; मीडियालाही सुनावलं
3

Virat Kohli: प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी घेतले 5 कोटी? आरोपांनंतर विराट कोहलीच्या टीमचं सडेतोड उत्तर; मीडियालाही सुनावलं

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.