Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इम्पॅक्ट प्लेयर’, मेंटर की …! CSK टीममध्ये MS Dhoni ची भूमिका काय असेल? Sanju Samson च्या एन्ट्रीने बदलली समीकरणं?

एम.एस. धोनी वयाच्या 44 व्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलची (इंडियन प्रीमियर लीग) सुरुवात २८ मार्च रोजी होत आहे. धोनीचा संघ सज्ज झाला आहे. पण धोनीची भूमिका नेमकी काय असेल?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 21, 2026 | 01:52 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • माहीचा शेवटचा हंगाम?
  • संजू सॅमसननंतर धोनीची संघात भूमिका काय?
  • जडेजाच्या विधानानं पुन्हा उजाळा
MS Dhoni CSK Role in IPL 2026  : ‘थाला’, ‘कॅप्टन कूल’, ‘मास्टरमाइंड’, ‘माही’ अशा विविध नावांनी माहीला भारतीय क्रिकेट विश्वात ओळखलं जातं. आता एम.एस. धोनी वयाच्या 44 व्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलची (इंडियन प्रीमियर लीग) सुरुवात २८ मार्च रोजी होत आहे. धोनीचा संघ, चेन्नई सुपर किंग्स आपला सलामीचा सामना ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.

IPL 2026 पूर्वी BCCI ने दोन सामन्यांचे शेड्युल केलं जाहीर, कोणते संघ येणार आमनेसामने?

माहीचा शेवटचा हंगाम?

हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम आहे का अशा बऱ्याच चर्चा सुरु आहेत. मात्र या चर्चांकडे फक्त एक तर्क म्हणूनच पाहिलं गेले पाहिजे. कारण धोनी हे नावच मुळात ‘आश्चर्यां’चं प्रतिक म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आजवरचे असे बरेच सामने आहेत जे त्याने आपल्या चातुर्याच्या बळावर आणि आपल्या खेळाचा बळावर संघाला जिंकून दिले आहेत. मग तो हेलीकॉप्टर शॉर्ट असोत किंवा स्टंम्पच्या मागे उभं राहून विकेट किपींग करणं असोत. माहीने आपली जादू सगळीकडे पसरवली आहे. त्यामुळे भविष्यात तो आणखी काही हंगामांसाठी खेळताना दिसला, तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीही नसेल.

MaSter of the craft! ⚔️ #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/7iGWGra2v1 — Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 13, 2026

सॅमसननंतर धोनीची भूमिका काय?

धोनीने खेळावं आणि मोठ्या प्रमाणात खेळतच रहावं अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल. मा्त्र आता टीममधली समीकरणं बदलणार आहेत ? यासगळ्यानंत आता एक मोठा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो: आता जेव्हा संजू सॅमसन चेन्नईच्या संघात सामील झाला आहे. तो स्वतःही एक यष्टीरक्षक आहे. तेव्हा पुढे काय घडणार? हा मोठा प्रश्न आहे. शिवाय संघात यष्टीरक्षणाचा आणखी एक पर्याय म्हणून उर्वील पटेल उपलब्ध आहे. त्यामुळे ‘थाला’ फलंदाजीसाठी कोणत्या क्रमांकावर मैदानात उतरेल? हे पहावं लागेल.

‘ब्रँड धोनी’

चेन्नई संघाच्या प्रचंड जनसमर्थनामागील एक प्रमुख कारण म्हणजे खुद्द ‘ब्रँड धोनी’ हेच आहे. ज्या क्षणी तो मैदानात पाऊल ठेवतो, त्या क्षणी संपूर्ण स्टेडियममध्ये उत्साहाने उसळून उठतं. या क्षणाची तुलना दुसऱ्या कोणत्याही क्षणाशी न करण्यासारखी आहे. जरी गेल्या काही हंगामांमध्ये धोनीने फलंदाजीसाठी वरच्या फळीत (top order) स्थानी फलंदाजीसाठी उतरला नसला तरीही तो जेव्हा फलंदाजीसाठी क्रीजवर येतो. तेव्हा त्याने किती चेंडू खेळावे किंवा किती मोठे रन करावे संपूर्ण सामन्यात फक्त त्याच्या एन्ट्रीवेळी ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’च्या प्रेक्षकसंख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळते.

जडेजाचं विधान

२०२३ च्या हंगामादरम्यान, रवींद्र जडेजाने असे विधान केले की, जेव्हा जेव्हा तो CSK कडून फलंदाजीसाठी वरच्या फळीत येतो, तेव्हा चाहते तो लवकर बाद व्हावा अशी प्रार्थना करतात; जेणेकरून त्यांना ‘माही भाई’ (धोनी) ची फलंदाजी पाहता येईल. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, चाहते धोनीने फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर यावे आणि खेळावे, अशी इच्छा बाळगतात.

अनेक अनुभवी क्रिकेटपटूंनी चाहत्यांनी व्यक्त केलेल्या या भावनांना दुजोरा दिला आहे; अलीकडेच, एबी डिव्हिलियर्सने संघामधील धोनीच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले. डिव्हिलियर्सने स्पष्टपणे नमूद केले की, जर धोनी फलंदाजीच्या क्रमवारीत खालच्या क्रमांकावर येत असेल आणि आता तो संघाचे कर्णधारपदही भूषवत नसेल, तर तो चुकीच्या कारणांमुळे संघात आपले स्थान टिकवून आहे असं वाटतं आहे. त्यामुळे आता या सगळ्यात माही कोणत्या स्थानवर फलंदाजीसाठी येतोय आणि संघात नेमकी त्याची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL 2026: BCCI ने आयपीएल सामन्यांची संख्या 74 वरून 84 का केली? काय आहे यामागचं कारण?

Web Title: What will ms dhonis role be in the csk team has sanju samsons entry changed the dynamics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • cricket marathi news
  • CSK
  • IPL
  • IPL 2026
  • Mahendra Singh Dhoni
  • MS Dhoni Captain
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IND vs IRE: संजू सॅमसनची एक चूक पडणार ठरणार भारी! Vaibhav Sooryavanshi करणार ओपनिंग?
1

IND vs IRE: संजू सॅमसनची एक चूक पडणार ठरणार भारी! Vaibhav Sooryavanshi करणार ओपनिंग?

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया
2

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
3

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.