Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : रिंकू सिंगचे होणार पुनरागमन तर सुंदरला दाखवणार बाहेरचा रस्ता, पुण्याची सूर्याची नवी रणनीती

संघाच्या नजरा सीरिज जिंकण्यासाठी असतील तर इंग्लंड बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पुण्याची काळ्या मातीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. यावेळी भारताच्या कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार?

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 30, 2025 | 09:01 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड चौथा T२० सामना : पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभूत झाला आणि इंग्लंडने मालिकेत पुनरागमन केले. सध्या मालिकेमध्ये भारताच्या संघाकडे २-१ अशी आघाडी आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पुढील सामना पुण्यात खेळवला जाणार असून, या मालिकेत भारतीय संघाच्या नजरा सीरिज जिंकण्यासाठी असतील तर इंग्लंड बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पुण्याची काळ्या मातीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. यावेळी भारताच्या कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.

पुण्यामधील खेळपट्टीचा फिरकीपटूंना फायदा होईल त्याचबरोबर सुरुवातीला फलंदाजांना देखील मदत होऊ शकते. पण जसजसा खेळ पुढे जातो तसतसा तो अधिक फिरकीला अनुकूल बनतो. भारताने गेल्या दोन सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर खेळले आहेत. दोन सामन्यांत केवळ दोनच षटके टाकल्याने सुंदरला खेळवणे अनाकलनीय आहे. चेन्नईत त्याने फलंदाजीने धावा निश्चित केल्या, पण राजकोटमध्ये तो उंच फलंदाजी करूनही अपयशी ठरला. कोलकाता आणि चेन्नईमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शामीच्या जागी अर्शदीपला राजकोटमध्ये वगळण्यात आले.

मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्माच्या नात्यावर अभिनेत्रीच्या आईने केला खुलासा

पुण्यात भारतीय संघ रचनेत बदल होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू सिंग तंदुरुस्त असून तो पुण्यात खेळणार असल्याची खात्री आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी आलेल्या ध्रुव जुरैलला वगळले जाऊ शकते. तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अर्शदीप सिंगला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. जर आपण पुण्यातील भारतीय विक्रमाबद्दल बोललो तर भारतीय संघाने येथे चार टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत.

भारतीय संघ २०१२ मध्ये येथे इंग्लंडविरुद्ध सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, इंग्लंड संघाने याआधीच एका सामन्यात विजयाची चव चाखली आहे, अशा स्थितीत संघ आणखी धोकादायक ठरतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. या मालिकेवर नजर टाकली तर कोलकात्यात खेळलेला पहिला T२० आंतरराष्ट्रीय सामना भारताने सात गडी राखून जिंकला होता. त्यानंतर चेन्नईमध्ये यजमान संघाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आणि दोन विकेट राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. राजकोटमध्ये इंग्लिश संघाने जोरदार पुनरागमन करत २६ धावांनी विजय मिळवत मालिकेतील अंतर १-२ असे कमी केले.

T२० मालिकेचे अजुनपर्यत दोन सामने शिल्लक आहेत. त्यानंतर भारताचा संघ तीन सामान्यांची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही भारताच्या संघासाठी चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी एकमेव एकदिवसीय मालिका असणार आहे. यामध्ये भारताच्या संघाला चांगली कामगिरी करणे अनिवार्य आहे.

Web Title: Which players of team india will get a chance in the playing xi of india vs england 4th t20i

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • India vs England
  • Rinku Singh

संबंधित बातम्या

इंग्लड दौऱ्यानंतर काय शिकला करुण नायर? मुलाखतीत स्वतः खेळाडूने केले उघड, म्हणाला –  मला माझ्या चांगल्या…
1

इंग्लड दौऱ्यानंतर काय शिकला करुण नायर? मुलाखतीत स्वतः खेळाडूने केले उघड, म्हणाला – मला माझ्या चांगल्या…

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड
2

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड

Asia Cup 2025 : मागील T20 मालिकेत खेळूनही या प्लेयर्सचा आशिया कपच्या संघातून होणार पत्ता कट!
3

Asia Cup 2025 : मागील T20 मालिकेत खेळूनही या प्लेयर्सचा आशिया कपच्या संघातून होणार पत्ता कट!

Yuvraj Singh on Shubman Gill: शुभमन गिलच्या इंग्लंडमधील यशावर युवराज सिंगचे कौतुक; म्हणाला- ‘टीकाकारांच्या तोंडावर चपराक!’
4

Yuvraj Singh on Shubman Gill: शुभमन गिलच्या इंग्लंडमधील यशावर युवराज सिंगचे कौतुक; म्हणाला- ‘टीकाकारांच्या तोंडावर चपराक!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.