फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मोहम्मद सिराज – माहिरा शर्मा: सध्या अनेक भारतीय क्रिकेट खेळाडूंचे घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत२०२४ च्या T२० विश्वचषकानंतर भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि त्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविच या दोघांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची माहिती दिली होती. त्याचबरोबर सध्या चर्चेत असलेल्या टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेन्द्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत, पण अजुनपर्यत त्यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि त्याच्या पत्नीसोबत नात्यामध्ये देखील दुरावा आल्याचे सूत्रांची माहिती आहे.
याचदरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे नाव सध्या प्रेमाच्या खेळपट्टीवर खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिराजचे नाव आशा भोसले यांच्या नातवासोबत जोडले गेले होते. मात्र, जनाई आणि सिराज यांनी एकमेकांना भाऊ-बहीण म्हणत अफवांना पूर्णविराम दिला होता. मात्र आता सिराजचे नाव आणखी एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, बिग बॉसमध्ये दिसलेली माहिरा शर्माच्या प्रेमात सिराज क्लीन बोल्ड झाला आहे. बातमीनुसार, सिराज-माहिराच्या जवळच्या लोकांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र, सिराज किंवा माहिरा यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
बिग बॉस १३ मध्ये दिसलेली माहिरा शर्माच्या प्रेमात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज क्लीन बोल्ड झाला आहे. ताज्या वृत्तानुसार, सिराज आणि माहिराच्या जवळच्या लोकांनीही याला दुजोरा दिला आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाचे नाव नुकतेच जानाई भोसलेसोबत जोडले गेले. सिराजला तिच्या काही पोस्ट लाईक झाल्या आणि दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करायला सुरुवात केली. मात्र, नंतर सिराज आणि जनाई यांनी ही केवळ अफवा असल्याचे म्हटले. बिग बॉस व्यतिरिक्त माहिरा नागिन आणि कुंडली नावाच्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.
As per Etimes report, Cricketer #mohammadsiraj and BB13 fame & actress #mahirasharma are Dating and it’s confirmed. pic.twitter.com/Ck4LPyCBOE
— Bharat jatoliya🇮🇳 (@mrjatoliya97) January 29, 2025
१९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या भारतीय संघात मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर सिराज इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे संघातही नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिराजची कामगिरी काही खास नव्हती. सिराज त्याच्या रेषा आणि लांबीपासून पूर्णपणे हरवला होता. त्यामुळेच या मेगा स्पर्धेसाठी सिराजला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिराजने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत होता.