फोटो सौजन्य – X
सध्या भारतामध्ये अनेक लीग खेळवले जात महाराजा ट्रॉफी 2025 ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा पाचवा सामना हुबळी टायगर्स विरुद्ध बंगळुरू ब्लास्टर्स यांच्यामध्ये खेळण्यात आला होता. या पाचव्या सामन्यांमध्ये हुबळी टायगर्सने बंगळुरू ब्लास्टर्स विरुद्ध पाच विकेट्सने हा सामना जिंकला. हुबळी टायगर्सने या विजयाचा या सीजन मधील दुसरा विजय नावावर नोंदवला आहे. त्याचबरोबर गुणतालिकेमध्ये देखील पहिले स्थान गाठले आहे.
हुबली टायगर्स सलामीवीर फलंदाज मोहम्मद तहा याने महाराजा t20 ट्रॉफी 2025 मध्ये धुमाकूळ घातला आहे. मोहम्मद तहाने 12 ऑगस्ट रोजी शिवमयोगा लॉयन्स यांच्याविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने त्याच्या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात 53 चेंडूंमध्ये 101 धावा केल्या होत्या या त्याने सहा षटकार आणि दहा चौकार मारले होते. स्पर्धेचा पाचव्या सामन्यांमध्ये हुबळी टायगर्स यांचा सामना बेंगलोर ब्लास्टरस यांच्याविरुद्ध झाला होता या सामन्यांमध्ये मोहम्मद तहाने 54 चेंडूंमध्ये 101 धावा केल्या होत्या यामध्ये त्याने सात षटकार आणि नऊ चौकार मारले होते.
कोण आहे Saaniya Chandok? या कंपनीची मालक Arjun Tendulkar ची पार्टनर… जाणून इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बंगळुरू ब्लास्टर्सने सहा विकेट गमावून २२५ धावा केल्या. एलआर चेतन (२३) च्या रूपात संघाने आपला पहिला विकेट अवघ्या ३६ धावांवर गमावला. यानंतर रोहन पाटीलने मयंक अग्रवालसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी करत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. रोहन पाटील ४३ चेंडूत पाच षटकार आणि आठ चौकारांसह ८० धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला, तर सूरज आहुजाने संघाच्या खात्यात २७ धावा जमा केल्या.
ब्लास्टर्स संघाने १७१ धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. येथून रोहन नवीनने नवीन एमजीसोबत ५४ धावांची जलद भागीदारी करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. रोहन नवीन सात चेंडूत २४ धावा करून बाद झाला, तर नवीन एमजीने ११ चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली. विरोधी संघाकडून यशराज पुंजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर केसी करिअप्पाने दोन विकेट घेतल्या. याशिवाय रितेश भटकळने एक विकेट घेतली.