Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yash Dayal: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!

यश दयालला गोरखपूर लायन्सने ७ लाख रुपयांना खरेदी केले. ही स्पर्धा आजपासून सुरू होत आहे, परंतु आता यूपीसीएने यशला खेळण्यास बंदी घातली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 17, 2025 | 05:29 PM
Yash Dayal: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!
Follow Us
Close
Follow Us:
  • लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात
  • यूपी टी-२० लीगने घातली बंदी!
  • अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप
UP T20 League 2025: आरसीबीचा स्टार आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) विश्वासू गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) संकाट सापडला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर टिकणे आता त्याच्यासाठी अवघड झाले आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये मेरठ मावेरिक्स आणि कानपूर सुपरस्टार्स यांच्यातील पहिल्या सामन्याने सुरुवात होत आहे. मात्र, या स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच क्रिकेटपटू यश दयालसाठी एक मोठा धक्का बसला आहे. गंभीर आरोपांमुळे यश दयालला या लीगमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार, तो आता या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. गोरखपूर लायन्सने यश दयालला ₹७ लाख रुपयांना विकत घेतले होते.

यश दयालवर गंभीर आरोप आणि क्रिकेट करियर धोक्यात

गेली दोन वर्षे क्रिकेटच्या मैदानावर यश दयालची कामगिरी चांगली होती, पण आयपीएल २०२५ नंतर तो सर्वात कठीण काळातून जात आहे. याचं कारण क्रिकेट नाही, तर त्याच्यावर लागलेले गंभीर आरोप आहेत. गाझियाबादमध्ये एका मुलीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला, तर त्यानंतर जयपूरमध्ये दुसऱ्या मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला.

🚨 Cricketer Yash Dayal BANNED from UP T20 League after sexual harassment cases ➡️ UPCA bars him despite ₹7L Gorakhpur Lions contract ➡️ Accused in two cases: Ghaziabad (rape under pretext of marriage) & Jaipur (minor, POCSO Act) ➡️ Allahabad HC gave interim relief in one… pic.twitter.com/tJK60Dnavz — The Matrix (@thematrixloop) August 16, 2025

RCB चा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणी वाढल्या, लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकला! पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यूपी टी-20 लीगमध्ये यश दयालवर बंदी?

गाझियाबादमधील एका महिलेने यश दयालवर लैंगिक शोषणाचा आरोप लावताना काही फोटो शेअर केले आणि म्हटले की, त्याने लग्नाचं खोटं आश्वासन दिलं. या प्रकरणात त्याला अटकेतून दिलासा मिळाला आहे, पण त्यानंतरच जयपूरमध्ये त्याच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली. या प्रकरणात जयपूर उच्च न्यायालयाने क्रिकेटरच्या अटकेवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

याच दरम्यान, उत्तर प्रदेश टी-20 लीगने त्याच्यावर बंदी घातल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप न झाल्यामुळे यूपीसीएने त्याच्यावर बंदी घातली आहे की यश दयालने स्वतःहून या लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दोन्हीपैकी काहीही असो, या आरोपांनंतर यश दयालचा क्रिकेट करियर धोक्यात असल्याचं मात्र निश्चित आहे.

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप

आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या यश दयालवर जयपूरमध्ये POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा आरोप आहे की, जयपूरमध्ये आयपीएल सामन्यादरम्यान यशने तिला भेटल्यानंतर करियर संबंधित सल्ला देण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिचे लैंगिक शोषण केले. या तक्रारीनुसार, त्यावेळी मुलीचे वय १७ वर्षे होते.

Web Title: Yash dayal banned up t20 league sexual harassment allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Sports
  • Sports News
  • Yash Dayal

संबंधित बातम्या

IPL 2026: फलंदाजांचा कर्दनकाळ! 49 सामन्यांनंतर ‘हे’ गोलंदाज ठरले डॉट बॉल किंग; यादीत कोणाचे नाव?
1

IPL 2026: फलंदाजांचा कर्दनकाळ! 49 सामन्यांनंतर ‘हे’ गोलंदाज ठरले डॉट बॉल किंग; यादीत कोणाचे नाव?

माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन; वयाच्या 36 व्या जगाला निरोप, क्रिकेट विश्वात शोक
2

माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन; वयाच्या 36 व्या जगाला निरोप, क्रिकेट विश्वात शोक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.