Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : बाबर आझमला संघामधून का वगळलं? मुख्य प्रशिक्षकांने दिले उत्तर

पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे यामध्ये मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनाही वगळण्यात आले आहे. यांना संघामध्ये स्थान न मिळाल्यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी स्पष्टीकरण दिल

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 17, 2025 | 03:05 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

दुबईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपला काही दिवस शिल्लक राहिले आहे. यासाठी आता पाकिस्तानच्या संघाने संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तान संघाचा 12 सप्टेंबर रोजी आशिया चषकाचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई हे चार संघ अ गटांमध्ये आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे यामध्ये मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनाही वगळण्यात आले आहे. आशिया कप 2025 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 

आशिया कप 2025 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सलमान अली आगा यांच्याकडे पाकिस्तान संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर संघाची घोषणा केली आहे यामध्ये, संघातील दोन वरिष्ठ खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघात संधी न मिळाल्यामुळे सर्वानाच धक्का बसला आहे. असे मानले जाते की आता पीसीबीला टी20 संघात या दोन खेळाडूंची आवश्यकता नाही. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघामध्ये स्थान न मिळाल्यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि या दोघांना संघात स्थान का मिळाले नाही यासंदर्भात सांगितले आहे. 

Mike Hesson on Babar Azam’s place in the T20I squad. “Our current squad is performing really well. Sahibzada Farhan, for example, has played 6 matches and earned 3 POTM awards. Saim and Fakhar have also been impressive. What we want are players who can deliver with real impact”. pic.twitter.com/I0sawI0LbP — Salman. (@TsMeSalman) August 17, 2025

बाबर आजमला संघामधून वगळल्यानंतर काय म्हणाले माइक हेसन?

पाकिस्तान संघाच्या घोषणेनंतर, पत्रकार परिषदेत जेव्हा मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना बाहेर ठेवण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की सध्या आमच्याकडे असलेले खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. जसे साहिबजादा फरहान यांनी ६ सामने खेळले आहेत आणि ३ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. फखर जमान आणि सॅम अयुब यांनी चांगली कामगिरी केली आहे. सध्या आम्हाला अशा खेळाडूंची गरज आहे जे उत्कृष्ट कामगिरी करतात.

कोच पुढे म्हणाले की, “बीबीएल खेळून बाबर आझमला स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. जेणेकरून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रात तो सुधारणा करत आहे हे दिसून येईल. बाबर एक चांगला खेळाडू आहे आणि आपण त्याच्यावर चर्चा केल्याशिवाय राहू शकत नाही. बाबरला काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे, जसे की फिरकीविरुद्ध त्याची कामगिरी आणि स्ट्राईक रेट.”

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान

आशिया कप 2025 साठी पाकिस्तान संघाचा हा संघ 

सलमान अली आगा (कर्णधार), फखर जमान, सैम अयुब, हसन अली, अबरार अहमद, हसन नवाज, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, हारिस रौफ, हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), वसीम जूनियर, सुफियान मोकीम, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी.

Web Title: Asia cup 2025 why was babar azam dropped from the team the head coach gave the answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Babar Azam
  • cricket
  • PCB
  • Sports
  • team pakistan

संबंधित बातम्या

Jasprit Bumrah Video : बुमराहच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद चिघळला, बवुमाला बुटके म्हटल्यानंतर प्रशिक्षकांनी दिले प्रत्युत्तर
1

Jasprit Bumrah Video : बुमराहच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद चिघळला, बवुमाला बुटके म्हटल्यानंतर प्रशिक्षकांनी दिले प्रत्युत्तर

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
2

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

IND vs SA : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 159 धावांवर पहिल्या डावात गुंडाळलं! जसप्रीत बुमराहच्या हाती लागला पंजा
3

IND vs SA : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 159 धावांवर पहिल्या डावात गुंडाळलं! जसप्रीत बुमराहच्या हाती लागला पंजा

पाकिस्तानने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिला झटका, T20 ट्राय सिरीज खेळण्यास दिला नकार
4

पाकिस्तानने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिला झटका, T20 ट्राय सिरीज खेळण्यास दिला नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.