फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
गौतम गंभीर धमकी देणाऱ्या आरोपीला केली अटक : सध्या आयपीएल सुरु आहे या कारणास्तव सर्व खेळाडू आयपीएल २०२५ चे सामने खेळण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर भारताचे मुख्य कोच गौतम गंभीर देखील सध्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहेत. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ‘आयसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गौतम गंभीर याने २३ एप्रिल रोजी बुधवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआरसाठी तक्रार दाखल आणि त्यांना माहिती देऊन कुटुंबासाठी सुरक्षा मागितली. ही माहिती गौतम गंभीरच्या कार्यालयातून वृत्तसंस्था एएनआयला मिळाली. मात्र, आता पोलिसांनी गंभीरची तक्रार गांभीर्याने घेतली आहे आणि मोठे यश मिळवले आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव २१ वर्षीय जिग्नेशसिंग परमार असे आहे, तो गुजरातचा रहिवासी आहे अशी माहिती समोर आली होती आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. गौतम गंभीरला काही दिवसांपूर्वी मेलवर धमकी मिळाली होती. तथापि, पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
अभिषेक नायरला आणखी एक आनंदाची बातमी, आता KKR नंतर या संघाची सांभाळणार जबाबदारी
मध्य दिल्ली पोलिसांच्या पथकाने जिग्नेश सिंग परमारला ताब्यात घेतले आणि त्याची आणि त्यांच्या कुटूंबाची कसून चौकशी देखील करण्यात आली आहे. जेव्हा आरोपीची चौकशी केली तेव्हा चौकशीदरम्यान, त्याच्या कुटुंबाने सांगितले की तो मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणावर आता बारकाईने लक्ष दिले आणि घटनेचा सखोल तपास केला जात आहे. आरोपी जिग्नेश सिंगने याने हा मेल का पाठवला आणि त्यामागे इतर कोणतेही कारणे आहेत यावर तपास केला जात आहे, एवढेच नव्हे तर या मेल मागे म्हणजेच धमकीमागे किती व्यक्ती सामील आहे का याचा तपास केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या आरोपीची अधिक चौकशी सुरू असून पोलिस संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर गौतम गंभीरने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि लिहिले, “माझ्या प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत.” या हल्ल्यातील गुन्हेगारांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. गंभीरनेही या हल्ल्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली होती.
भारताच्या संघाने गौतम गंभीर यांच्या कोचिंगमध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. आता भारताचे संघ आयपीएलचे सामने खेळत आहे ही स्पर्धा झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. यावेळी भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची कामगिरी कशी असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
Praying for the families of the deceased. Those responsible for this will pay. India will strike. #Pahalgam
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 22, 2025