फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
गौतम गंभीर : भारताचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना २२ नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडूही मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. तर काही खेळाडू काही दिवसांमध्ये स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या ११ दिवसांआधी भारतीय संघाचा मुख्य कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. सोशल मीडियावर अनेक वृत्त समोर येत होते त्याचबरोबर मालिकेपूर्वी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते, ज्याचे उत्तर गौतम गंभीरने दिले. रोहित शर्मा मालिकेच्या पहिल्या कसोटीत उपलब्ध असेल की नाही हेही गंभीरने सांगितले.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वीच कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीला उपस्थित राहणार नसल्याच्या जोरदार बातम्या आल्या होत्या. रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबत बोलताना गंभीर म्हणाला, “सध्या रोहित शर्माबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. आशा आहे की तो उपस्थित असेल. मालिका सुरू होण्यापूर्वी तुम्हाला सर्व गोष्टी कळतील.” रोहित शर्मा उपलब्ध नसल्यास जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार असेल, असेही गंभीरने स्पष्ट केले. या मालिकेत बुमराह टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे.
हेदेखील वाचा – Gautam Gambhir : पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? ट्रोलर्सला कोच गंभीरने दिले सडेतोड उत्तर
केएल राहुलला विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर गंभीर म्हणाला, “केएल राहुल टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करू शकतो, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तो सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो – त्यामुळे तुमच्याकडे अनेक गोष्टी करण्याची क्षमता आहे.” तो एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेटकीपिंग करतो याचा विचार करा की केएल राहुलसारखे खेळाडू किती देशांकडे आहेत आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो एक पर्याय आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल गंभीर म्हणाला, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही खूप मेहनत करतात, ते अजूनही उत्कट आहेत, त्यांना अजूनही खूप काही मिळवायचे आहे आणि हे महत्वाचे आहे. भूक आहे. माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे, तो एक मजबूत माणूस आहे.”
भारताच्या संघाने १८ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियामध्ये अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहे. जाहीर करण्यात आले संघाच्या यादीमध्ये रोहित शर्माचं कर्णधार असणार आहे तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (वि. यष्टिरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.