फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
कोच गंभीर : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टीम सामान्यांची कसोटी मालिका भारतामध्ये झाली. यामध्ये भारताच्या संघाला तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि टीम इंडियाने मालिका गमावली. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीय संघाच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीर यांच्यावर पदावर देखील मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर सगळेच प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनीही यावर माइंड गेम्स खेळायला सुरुवात केली आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराट कोहलीच्या गेल्या 5 वर्षातील 2 शतकांवर चिंता व्यक्त केली होती, जेव्हा भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला पाँटिंगच्या या विधानाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गजांना सडेतोड उत्तर दिले.
हेदेखील वाचा – NZ vs SL : ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीची कमाल! न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेने जिंकलेला सामना गमावला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी, आज म्हणजेच सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यादरम्यान त्यांनी पाँटिंगला हे उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने अलीकडेच विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केला होता आणि म्हणाला होता की, मी विराटबद्दल एक आकडेवारी वाचली, त्यात म्हटले आहे की गेल्या पाच वर्षांत त्याने केवळ दोन (तीन) कसोटी शतके झळकावली आहेत, हे खरे आहे. तसे दिसत नाही पण तसे असेल तर ही चिंतेची बाब आहे. पाच वर्षात केवळ दोनच कसोटी शतके झळकावणारा जगातला एकही अव्वल दर्जाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नसेल.
गौतम गंभीरला पाँटिंगने केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा. रोहित आणि विराट हे कमालीचे बलवान खेळाडू आहेत.
हेदेखील वाचा – WI vs ENG : कॅप्टन बटलरने केला चौकार आणि षटकार पाऊस! वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर केलं पराभूत
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी काल म्हणजेच रविवारी 10 नोव्हेंबर रोजी रवाना झाली आहे, तर दुसरी तुकडी आज रवाना होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत सलग तिसऱ्यांदा कांगारूंना पराभूत करून डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश करण्याकडे लक्ष देईल. त्याआधीच भारतीय संघाच्या कर्णधार पदावर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये असे सांगण्यात येत आहे रोहित शर्मा दुसऱ्या बाबा होणार आहे त्यामुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये नसणार आहे. त्यामुळे कर्णधारपद हे जसप्रीत बुमराहकडे सोपवले जाणार असे म्हंटले जात आहे.