पॉचेफस्ट्रूम (दक्षिण आफ्रिका)– क्रिकेटमध्य आज कोण जगजेत्ता ठरणार आहे, याकडे क्रिकेटप्रेमीच लक्ष लागले आहे. भारत वि. इग्लंड (India Vs England Final) यांच्यात आज आयसीसीच्या अंडर 19 महिला टी 20 वर्ल्डकपचा (ICC Under-19 Women’s T20 World Cup ) अंतिम सामना रंगणार आहे. संध्याकाळी 5.15 वाजता या सामन्याला सुरुवात होणारे. दरम्यान, उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 धावांनी पराभव केला. तर टीम इंडियाने (India) न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. भारताच्या दणदणीत विजयानंतर इंग्लंडनेही रोमहर्षक सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळ आज (29 जानेवारीला) भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे होणार आहे. त्यामुळं अंडर-19 महिला टी-20 वर्ल्डकप कोण जिंकणार याकडे क्रिकेटप्रेमीच लक्ष लागले आहे.
दरम्यान, उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ अवघ्या 99 धावांवर गडगडला. यादरम्यान अॅलेक्स स्टोनहाउसने संघाकडून सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याने 33 चेंडूत 25 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 96 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे इंग्लंडने रोमहर्षक विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियन डावात इंग्लंडमधील हॅना बेकर धोकादायक गोलंदाजी. त्याने 4 षटकात फक्त 10 धावा देत 3 बळी घेतले. कर्णधार ग्रेस स्क्रिव्हनने 3.4 षटकात 8 धावा देत 2 बळी घेतले. एली अँडरसननेही एक विकेट घेतली. त्याने 2 षटकात 6 धावा दिल्या.
या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उत्तम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा अंतिम सामना रोमांचक होऊ शकतो. या सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा असू शकतो. टीम इंडियाने या स्पर्धेत केवळ एकच सामना गमावला आहे. त्याचा ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळं आजच्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे, पण शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. त्यामुळं अंडर-19 महिला टी-20 वर्ल्डकप कोण जिंकणार याकडे क्रिकेटप्रेमीच लक्ष लागले आहे.






