फोटो सौजन्य - Lucknow Super Giants सोशल मीडिया
Mitchell Marsh : लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा २६ वा सामना खेळवला जात आहे. यामध्ये रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी लखनौच्या कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक झाल्यानंतर संघामधील बदल सांगितले. आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे कारण त्यांच्या संघामध्ये फॉर्ममध्ये असलेला खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शशिवाय खेळावे लागेल.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेकीदरम्यान घोषणा केली की मिचेल मार्श त्याची मुलगी आजारी असल्याने वैयक्तिक कारणांमुळे सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दिल्लीचा फलंदाज हिम्मत सिंगला संघात स्थान देण्यात आले आहे आणि त्याला आज पदार्पणाची संधी मिळाली आहे.
🚨BREAKING 🚨 Mitchell Marsh will not be playing today for LSG as his daughter is unwell. 🤕#IPL2025 #LSGvGT #MitchellMarsh pic.twitter.com/nIictkEYuG — Sportskeeda (@Sportskeeda) April 12, 2025
जर मिचेल मार्श खेळत नसेल तर त्याच्या जागी हिम्मत सिंगला संधी देण्यात आली आहे. कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, हिम्मत सिंग आता मिचेल मार्शच्या जागी संघात खेळेल. हिम्मत हा दिल्लीचा रहिवासी आहे आणि त्याने यापूर्वी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळले आहे. या हंगामाच्या मेगा लिलावात त्याला लखनौ सुपर जायंट्सने ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले. हिम्मत सिंगने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ५५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने यामध्ये ५ वेळा अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट १३२.५१ आहे. आतापर्यंत त्याने एकूण ९१७ धावा केल्या आहेत.
In-form Mitchell Marsh misses out, Himmat Singh makes his IPL debut, and Washington Sundar returns to the playing XI for GT. 🙌🏼#IPL2025 #LSGvGT #MitchellMarsh pic.twitter.com/rHdGqSDZnV — Sportskeeda (@Sportskeeda) April 12, 2025
एलएसएलचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की मिशेल मार्श या सामन्यात खेळत नाही कारण त्याची मुलगी बरी नाही. मार्श ऑस्ट्रेलियाला परतला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु तो सध्या संघाचा भाग नाही. मिचेल मार्श या हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळला आहे आणि तो संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने डावाची सुरुवात करताना ५ सामन्यांमध्ये ४ अर्धशतके झळकावली आहेत आणि एकूण २६५ धावा केल्या आहेत. मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू असला तरी, दुखापतीनंतर तो पुनरागमन करत असल्याने तो सध्या फक्त फलंदाजी करत आहे.