फोटो सौजन्य - CSK/X सोशल मीडिया
IPL 2025 CSK vs KKR : आयपीएल २०२५ मध्ये, चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून ८ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या हंगामात सीएसकेचा हा सलग पाचवा पराभव होता. या हंगामात सीएसकेची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी सलग ५ सामन्यांमध्ये सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर कोलकाता नाईट राइडर्सचा या विजयासह स्पर्धेचा तिसरा विजय होता, या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये कोलकाताच्या संघाने पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे. कोलकाता नाईट राइडर्सने चेन्नईविरुद्ध विजयानंतर गुणतालिकेमध्ये तिसरे स्थान गाठले आहे.
कालच्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांची अत्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संघाच्या फलंदाजावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी नंतर सीएसकेच्या पराभवानंतर अधिक व्हायरल झाली.
Game set and done in a thumping style ✅@KKRiders with a 𝙆𝙣𝙞𝙜𝙝𝙩 to remember as they secure a comprehensive 8️⃣-wicket victory 💜
Scorecard ▶ https://t.co/gPLIYGiUFV#TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/dADGcgITPW
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2025
आयपीएल २०२५ चा २४ वा सामना ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० वाजता चेपॉक येथे खेळवण्यात आला. या सामन्यापूर्वी, डेल स्टेनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले होते की, “काही लोक असे आहेत जे खरोखरच या लीगमध्ये नसावेत.” स्टेनने त्याच्या पोस्टमध्ये कोणत्याही संघाचे किंवा खेळाडूचे नाव घेतलेले नाही, परंतु काही वापरकर्ते आता ते सीएसके कर्णधार एमएस धोनीशी जोडत आहेत. स्टॅनच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत.
There’s some guys that really shouldn’t be at this league.
— Dale Steyn (@DaleSteyn62) April 10, 2025
या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत खेळाडू अपयशी ठरत आहेत. या हंगामात धोनी पूर्वीसारखा खेळू शकत नसल्याने त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याशिवाय, मेगा लिलावात खेळाडूंच्या निवडीवरूनही सीएसकेला ट्रोल केले जात आहे.
अर्धे हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे आणि सीएसके संघ पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर आहे. येथून, सीएसकेला प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण मानले जात आहे. सीएसकेचे सध्या ८ सामने शिल्लक आहेत, त्यापैकी ७ सामने संघाला जिंकावे लागतील जे तितके सोपे असणार नाही.