Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंड Champions Trophy मध्ये अफगाणिस्तानवर बहिष्कार टाकणार? भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान ECB चा मोठा निर्णय

इंग्लंडमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणावर सविस्तर वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 07, 2025 | 12:51 PM
फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया

फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे, यासाठी पाकिस्तान आणि युएईला जोरदार तयारी सुरु आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे पण भारताचा संघ सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तान जाणार नाही, त्यामुळे स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. भारताचे सर्व सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. पण त्याआधी इंग्लंडमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

इंग्लंडच्या अनेक राजकारण्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याला विरोध केला. खरं तर, २०२१ मध्ये जेव्हा तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानात आपले राज्य सुरू केले तेव्हा तेथे महिला क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आयसीसीच्या नियमांनुसार, पुरुष क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांना महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन द्यावे लागते आणि त्यांचा स्वतःचा किमान एक संघ असला पाहिजे.

तथापि, अफगाणिस्तान महिला संघाला मैदानात उतरण्यास तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. यामुळे अफगाणिस्तान संघाला सतत विरोधाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने अनेक वेळा अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळण्यास नकार दिला आहे. गेल्या महिन्यात, ब्रिटिश खासदारांच्या एका गटाने इंग्लंडला २६ फेब्रुवारी रोजी लाहोर येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या गट टप्प्यातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याची विनंती केली होती. दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेटन मॅकेन्झी यांनीही याला पाठिंबा दिला.

जसप्रीत बुमराह Champions Trophy 2025 खेळणार नाही? हर्षित राणाच्या एकदिवसीय पदार्पणाने दिले संकेत

तथापि, ईसीबीचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनी सांगितले की ते सरकार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर सामना खेळवतील. त्यांनी असेही म्हटले की, अफगाणिस्तानच्या समस्या एकट्या क्रिकेट समुदायाला सोडवता येणार नाहीत.

“आम्ही ऐकले आहे की अनेक सामान्य अफगाण नागरिकांसाठी, त्यांच्या क्रिकेट संघाचा खेळ पाहणे हे मनोरंजनाच्या काही मोजक्या प्रकारांपैकी एक आहे. आम्ही सामना खेळणार आहोत याची आम्ही पुष्टी करू शकतो,” थॉम्पसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. तालिबान म्हणतात की ते इस्लामिक कायद्याच्या आणि स्थानिक रीतिरिवाजांच्या त्यांच्या व्याख्येनुसार महिलांच्या हक्कांचा आदर करतात आणि हे अंतर्गत मुद्दे आहेत जे स्थानिक पातळीवर सोडवले पाहिजेत.

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या ६ फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीआधी तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमधील पहिला सामना झाला आहे. या पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने इंग्लंडला ६८ चेंडू शिल्लक असताना ४ विकेट्सने पराभूत केले आहे. आता या विजयासह भारताच्या संघाकडे मालिकेमध्ये १-० अशी आघाडी आहे. या मालिकेचा दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना बाराबती ओडिशा येथे रंगणार आहे तर तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात आला आहे.

Web Title: Will england boycott afghanistan in the champions trophy big decision by ecb during the series against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • cricket

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धक भिडले, मृदुल तिवारीच्या तोंडाला लागला मार! पहा Promo
1

Bigg Boss 19 : कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धक भिडले, मृदुल तिवारीच्या तोंडाला लागला मार! पहा Promo

Photo : ‘हॅट्रिक’ असो किंवा गोलंदाजीत ‘पंजा’ अमित मिश्राने अनेक विक्रम केले नावावर!
2

Photo : ‘हॅट्रिक’ असो किंवा गोलंदाजीत ‘पंजा’ अमित मिश्राने अनेक विक्रम केले नावावर!

आर अश्विननंतर भारताच्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृती! कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक
3

आर अश्विननंतर भारताच्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृती! कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

शिखर धवन ईडीच्या रडारवर, बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ‘गब्बर’ची चौकशी होणार
4

शिखर धवन ईडीच्या रडारवर, बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ‘गब्बर’ची चौकशी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.