फोटो सौजन्य : Proteas Men
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना सुरु आहे. या सामन्याचा आज चौथा दिवस खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आता विजयासाठी फक्त 69 धावांची गरज आहे. कालच्या सामन्यामध्ये एडन मार्करम आणि टेम्बा बवुमा यांनी कमालीची कामगिरी केली आहे आणि कालच्या दिनाच्या समाप्तीनंतर दोघेही फलंदाज नाबाद आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेच्या संघाचा धावसंख्या २१३/२ होती आणि त्यांना विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. एडेन मार्कराम (१०२*) आणि टेम्बा बावुमा (६५*) क्रीजवर नाबाद आहेत.
दोघांमध्ये १४३ धावांची भागीदारी झाली आहे आणि आता ते गेल्या २७ वर्षांपासून आफ्रिकेच्या कपाळावरचा ‘चोकर्स’चा डाग पुसून टाकतील अशी अपेक्षा आहे. जर दक्षिण आफ्रिकेचा संघ २०२५ च्या WTC फायनलचा किताब जिंकला तर तो त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण असेल. कारण, २७ वर्षांत पहिल्यांदाच आफ्रिकेचा संघ आयसीसी ट्रॉफी उचलत आहे.
SA vs AUS : WTC फायनलमध्ये एडन मार्करमसमोर स्टार्क – हेजलवूड – कमिन्स फेल, खेळाडूंने ठोकले शतक
मोठ्या स्पर्धांमध्ये महत्त्वाच्या वेळी दबावाखाली कोसळण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अनेकदा ‘चोकर्स’ असे नाव देण्यात आले आहे. १९९८ मध्ये ढाका येथे आयसीसी नॉकआउट ट्रॉफी जिंकल्यापासून, त्यांनी ( १९९८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने शेवटचा आयसीसी ट्रॉफी जिंकला होता ) कोणतेही मोठे आयसीसी स्पर्धा विजेतेपद जिंकलेले नाही.
Ready to break a trophy drought at the #WTC25 Final 🏆
ICC Hall of Famer and former South African captain Graeme Smith hails a Proteas team set to rewrite history 🗣️https://t.co/OjfdHt93Tn
— ICC (@ICC) June 14, 2025
अनेक वेळा ते उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचण्यास चुकले, ज्यामुळे त्यांना चोकरचा टॅग मिळाला. २०२४ च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. परंतु, २०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC अंतिम २०२५) अंतिम सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचा संघ यावेळी विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि जर त्यांनी हे विजेतेपद जिंकले तर तो त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण असेल.