फोटो सौजन्य : Proteas Men
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये एडम मार्करमचे शतक : आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा कदाचित शेवटचा दिवस असू शकतो. या पाच दिवसाच्या सामन्यात आज चौथा दिवस हा हा शेवट ठरू शकतो. ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कालपासून म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवसापासून एडन मार्करम आणि टेंबा बवुमा हे नाबाद खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ आता विजयापासून फक्त 69 धावा दूर आहे. याचे कारण म्हणजेच एडन मार्करमची दमदार खेळी. त्याने कालचा संपूर्ण दिवसात कहर केला आहे आणि दुसरा इनिंग मध्ये एकही धाव न करता बाद झाल्यानंतर त्यांनी त्याची कसर ही चौथ्या इनिंगमध्ये पूर्ण केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये एडन मार्करम हा हिरो ठरला होता, तो पहिल्या इनिंगमध्ये एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आता त्याने त्याची भरपाई ही चौथ्या इनिंगमध्ये पूर्ण केली आहे. त्याने या चौथ्या इनिंगमध्ये तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर १५९ चेंडूमध्ये १०२ नाबाद धावा केल्या आहेत. त्याला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा मुल्डर आणि कर्णधार टेंबा बवुमा यांची साथ लाभली. टेंबा बवुमा याने चांगली कामगिरी केली आहे त्याने तिसऱ्या दिवशी ६२ नाबाद धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटची आयसीसी ट्रॉफी ही १९९८ मध्ये जिंकली होती. त्यांनी अनेकदा आयसीसी फायनल खेळल्या आहेत पण कोणताही कर्णधार २८ वर्षांमध्ये संघाला आयसीसी ट्रॉफी मिळवून देऊ शकला नाही. आता टेंबा बवुमा हा पराक्रम करणार का? आणि संघाचा २८ वर्षाचा दुष्काळ संपवणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
A century of the highest class from Aiden Markram! 💯🔥
Composed under pressure, fearless in execution, what a time for a knock for the ages. 🇿🇦💪
A phenomenal player rising to the occasion when it matters most. Take a bow, Markram, pure brilliance! 🔥👏 #WTCFinal #WozaNawe… pic.twitter.com/8a56K43jpf
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 13, 2025
या सामन्यांबद्दल संघाचे झाले तर पहिला डावामध्ये दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी निराशाजनक राहिली संघाने लवकर विकेट गमावले होते आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने १३८ धावांवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गुंडाळल. त्यामुळे पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियन संघाकडे आघाडी होती. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चौथ्या इनिंगमध्ये त्यांचा खेळ सुधारला आणि चांगली फलंदाजी केली आणि संघ आता फक्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्यापासून ६९ धावा दूर आहे.
एडन मार्करम हा पहिल्या चेंडूपासून टिकून राहिला रायन रिकल्टन याचा विकेट लवकर गमावल्यानंतर मार्करम आणि मुल्डर यांनी अर्धशतकीय भागीदारी केली. त्यानंतर मुल्डर झेलबाद झाला, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा हा फलंदाजी आला आणि मार्करम आणि बावुमा यांच्यामध्ये शतकीय भागीदारी झाली आणि त्याचा फायदा संघाला झाला.