Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहली सचिन तेंडुलकरचा लिस्ट ए क्रिकेटमधील विश्वविक्रम मोडणार का? वाचा सविस्तर माहिती

१५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीची सुरुवात चांगली झाली. आंध्रविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून त्याने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 25, 2025 | 11:45 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

१५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीचा सामना विराट कोहली याने खेळला, यामध्ये त्याने शतकही झळकावले. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही त्याच्या संघासाठी विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळताना पाहायला मिळाले, यावेळी दोन्ही दिग्गज खेळाडूंनी शतके झळकावली. १५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीची सुरुवात चांगली झाली. आंध्रविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून त्याने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. चेस मास्टर विराट कोहलीने २९९ धावांचा पाठलाग करताना १३१ धावांची शानदार खेळी केली. 

लिस्ट-ए क्रिकेटमधील कोहलीचे हे ५८ वे शतक होते, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याचे ५३ शतके समाविष्ट आहेत. आता विराट कोहलीचे लक्ष सचिन तेंडुलकरच्या लिस्ट-ए मध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या ‘महान विक्रम’वर आहे. तुम्हाला सांगतो की, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरमध्ये आता फारसे अंतर राहिलेले नाही. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आहेत आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे, ५३८ डावांमध्ये ६० शतके झळकावली आहेत.

Vijay Hazare Trophy: ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’नंतर आता विराट आणि रोहितचा पुढील सामना कधी होणार? वाचा संपूर्ण डिटेल्स

विराट कोहली आता त्याच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने ३३० डावांमध्ये ५८ शतके केली आहेत. किंग कोहली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून फक्त दोन शतके दूर आहे आणि त्याचा विश्वविक्रम मोडण्यापासून तीन शतके दूर आहे.रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. त्याने सिक्कीमविरुद्ध १५५ धावांची धमाकेदार खेळी केली. हे त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीतील ३७ वे शतक होते.

लिस्ट अ मध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज

  • सचिन तेंडुलकर – ६०
  • विराट कोहली – ५८
  • गाव गूच – ४४
  • ग्रॅम हिक – ४०
  • कुमार संगकारा – ३९
  • रोहित शर्मा – ३७
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या दिल्ली संघाचा पुढील सामना २६ डिसेंबर रोजी गुजरातविरुद्ध आहे, तर रोहित शर्माच्या मुंबई संघाचा सामना त्याच दिवशी उत्तराखंडशी होईल. पुढील सामन्यातही दोन्ही भारतीय दिग्गज खेळाडू धमाल करतील अशी अपेक्षा आहे.

Web Title: Will virat kohli break sachin tendulkar world record in list a cricket read detailed information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Sachin Tendulkar
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…
1

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण
2

तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण

‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ
3

‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ

BCCI’s annual contract announcement ! ‘रो-को’ला बसला आर्थिक फटका; बोर्डाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर यादी 
4

BCCI’s annual contract announcement ! ‘रो-को’ला बसला आर्थिक फटका; बोर्डाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर यादी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.