Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wimbledon 2025 : Novak Djokovic चा जलवा कायम! डे मिनौरचा पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी

विम्बल्डन २०२५ मध्ये नोवाक जोकोविच चांगली कामगिरी करत आहे. सर्बियाच्या या दिग्गज  टेनिसपटूने ११ व्या मानांकित अ‍ॅलेक्स डी मायनरचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 08, 2025 | 02:25 PM
Wimbledon 2025: Novak Djokovic continues his dominance! De Minaur defeats to reach quarterfinals

Wimbledon 2025: Novak Djokovic continues his dominance! De Minaur defeats to reach quarterfinals

Follow Us
Close
Follow Us:

wimbledon 2025 : नोवाक जोकोविच विम्बल्डन २०२५ मध्ये शानदार कामगिरी करताना दिसत आहे. सर्बियाच्या या दिग्गज  टेनिसपटूने ११ व्या मानांकित अ‍ॅलेक्स डी मायनरचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव करून  क्वार्टर फायनलमध्ये थाटात प्रवेश केला. हा सामना ७ जुलै रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात नोवाकने आपल्या अनुभवाची ताकद पणाला लावून उत्तम खेळ खेळला.

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा विम्बल्डन २०२५ मध्ये जेतेपद पटकवाण्याच्या दिशेने भरभक्कम वाटचाल सुरू केली आहे. प्री-क्वार्टर फायनल सामन्यात त्याने अ‍ॅलेक्स डी मायनरला ३-१ च्या फरकाने पराभूत केले आहे. त्यानंतर त्याचे क्वार्टर फायनलमध्ये स्थान पक्के केले.

हेही वाचा : Virat Kohli – Anushka Sharma च्या लंडनमधील घरचा पत्ता लागला हाती! इंग्लिश खेळाडूने उघड केले रहस्य

प्री-क्वार्टर फायनल सामन्यात नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा आपण एक दिग्गज टेनिसपटू असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. या सामन्यात जोकोविचची सुरुवात फारशी खास नव्हती. पहिल्या फेरीत तो १-६ ने पिछाडीवर होता. यानंतर, स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला होता. पण त्यानंतर या दिग्गज खेळाडूने असे काही पुनरागमन केले की त्याने सामना आपल्या खिशात टाकला आहे.

पुढील दोन सेटमध्ये जोकोविचने प्रतिस्पर्ध्याला पुनरागमन करण्याचा एक देखील चान्स दिला नाही. त्याने हा सेट ६-४, ६-४ असा जिंकला. अशाप्रकारे नोवाक जोकोविचने स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. आता तो त्याच्या कारकिर्दीत १६ व्यांदा क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा खेळाडू ठरला आहे. सध्या जोकोविच ३८ वर्षांचा आहे आणि तो जागतिक टेनिस रँकिंगमध्ये ६ व्या स्थानावर आहे.

विराट कोहली जोकोविचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. जोकोविचच्या या शानदार विजयानंतर विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर या दिग्गज खेळाडूच्या विजयाची स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत विराट कोहलीने लिहिले की ‘किती छान सामना होता. ग्लॅडिएटरसाठी नेहमीप्रमाणेच हे सोपे काम होते.’

हेही वाचा : RCB चा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणी वाढल्या, लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकला! पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विम्बल्डन सामना बघण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी या टेनिस स्पर्धेत आपली उपस्थिती नोंदवली आहे. १० वर्षांपूर्वी देखील हे कपल टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी हजर राहिले होते.

Web Title: Wimbledon 2025 novak djokovic defeats de minaur to reach quarterfinals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Novak Djokovic
  • Wimbledon

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.