Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wimbledon 2026: मोठा उलटफेर! ओसाकाचा सुपर शो; नंबर-1 सबालेंकाचा पराभव, सिनर सलग पाचव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये

Naomi Osaka beat Aryna sabalenka jannik sinner enter in quarterfinals of wimbledon 2026: जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जॅनिक सिनरने विम्बल्डन २०२६ मध्ये सलग पाचव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर, नाओमी ओसकाने आर्यना सबालेन्काचा पराभव केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 06, 2026 | 03:28 PM
Wimbledon 2026: मोठा उलटफेर! ओसाकाचा सुपर शो; नंबर-1 सबालेंकाचा पराभव, सिनर सलग पाचव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये
Follow Us
Follow Us:
  • ओसाकाने नंबर-1 सबालेंकाला हरवले
  • सिनरची क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री
  • मोचिझुकीने दिली कडवी झुंज
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या टेनिसपटू जॅनिक सिनरने विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) मध्ये आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. सिनरने जपानच्या पात्रता फेरीतील खेळाडू शिंतारो मोचिझुकीला ६-३, ७-६(०), ६-३ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासह, सिनरने सलग पाचव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम ८ मध्ये स्थान मिळवले. दरम्यान, जपानची स्टार खेळाडू नाओमी ओसाकाने सेंटर कोर्टवर शानदार कामगिरी करत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आर्यना सबालेन्काला ६-२, ७-६(२) अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच प्रवेश केला.

IND vs ENG: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी कसोटी, तिसरा सामना कधी अन् किती वाजता?

मोचिझुकीने दिली कडवी झुंज

स्कोअरलाइन जरी एकतर्फी दिसत असली तरी, मोचिझुकीने सिनरला अनेक वेळा अडचणीत आणले. पहिल्या सेटमध्ये, त्याने सुरुवातीलाच ब्रेक पॉइंट मिळवला, पण सिनरने तो वाचवला आणि लगेचच त्याची सर्व्हिस ब्रेक करून तो सेट ६-३ ने जिंकला.

दुसरा सेट सर्वात रोमांचक होता. मोचिझुकीने आपल्या उत्कृष्ट सर्व्हिस आणि मजबूत डिफेन्सच्या जोरावर सामना ४-४ असा बरोबरीत आणला. त्याने लांब रॅलींमध्ये सिनरला सतत आव्हान दिले . परंतु, टाय-ब्रेकमध्ये सिनरचा अनुभव कामी आला आणि त्याने एकही पॉइंट न गमावता टाय-ब्रेक ७-० ने जिंकला. त्यानंतर, तिसऱ्या सेटमध्ये, सिनरने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले आणि तो सेट ६-३ ने जिंकला.

ओसाकाने घडवला स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर

केवळ एक तास आणि २८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात, ओसाकाने सुरुवातीपासूनच पूर्णपणे वर्चस्व गाजवले. आपल्या दमदार सर्व्हिस आणि आक्रमक ग्राऊंड स्ट्रोक्सने तिने सबालेंकाला लय पकडण्याची संधीच दिली नाही. ओसाकाने पहिल्या सेटमध्ये सतत दबाव कायम ठेवला आणि ६-२ ने सहज विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये, सबालेंकाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि सामना टाय-ब्रेकमध्ये नेला, पण तिथेही ओसाकाने शानदार खेळ दाखवत टाय-ब्रेक ७-२ ने जिंकून सामना आपल्या नावावर केला.

हा विजय ओसाकासाठी विशेषतः खास होता, कारण २०२६ मध्ये सबालेन्काविरुद्धचे तिचे मागील तिन्ही सामने ती हरली होती. शिवाय, तिने २०१८ च्या यूएस ओपननंतर प्रथमच सबालेन्काला पराभूत केले. आई झाल्यानंतर कोर्टवर परतलेल्या ओसाकाने दमदार कामगिरी केली.

Women’s T20 World Cup 2026: डॅनी वायट-हॉजने गोलंदाजांना धुतले, श्री चरणीच्या फिरकीने फलंदाज उद्ध्वस्त; स्पर्धेत दोघींचाच जलवा

Web Title: Wimbledon 2026 sinner beat mochizuki osaka best sabalenka quarterfinal upset

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Jannik Sinner
  • Tennis
  • Wimbledon

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.