IPL 2024च्या गुणतालिकेतचं गणित : इंडियन प्रीमियर लीगच्या सुपर संडेला दोन सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. यामध्ये चेन्नईच्या संघाने राजस्थानचा 5 विकेट्सने पराभव केला. चेन्नईच्या संघासाठी कालचा सामना जिंकणे महत्वाचे होते. त्यामुळे चेन्नईचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. राजस्थानच्या संघाला अजूनही प्लेऑफमध्ये जागा मिळाली नाही. कालचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये पाहायला मिळाला. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कालचा सामना 47 धावांनी जिंकला.
[read_also content=”मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत! सिग्नल बिघडल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर मोठा परिणाम https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-railway-service-disrupted-major-impact-on-central-railway-line-due-to-signal-failure-532728.html”]
जाणून घ्या गुणतालिकेतचं गणित
कालच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याचा प्रभाव नक्कीच कालच्या दिल्ली आणि बंगळुरूच्या सामन्यावर झाला. गुणतालिकेचा विचार केला तर कोलकाता नाईट रायडर्स सध्या अव्वल स्थानावर आहेत. कोलकाताच्या संघाने प्लेऑफमध्ये एंट्री केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्लेऑफमध्ये जाणारा एकमेव संघ आहे. त्यानंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर 16 गुणांसह राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. कालच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सचा संघ 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
सनरायझर्स हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादच्या संघाने आतापर्यत 12 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. कालच्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून पाचव्या स्थानावर उडी मारली आहे. प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ शर्यतीत कायम आहेत.
[read_also content=”आधीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस https://www.navarashtra.com/maharashtra/two-person-died-due-to-lighting-strike-incident-in-amaravati-nrka-532720.html”]
या संघांचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट
पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि कालच्या सामन्यांमध्ये पराभूत झालेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ या शर्यतीतून बाहेर झाला आहे. पंजाब किंग्सचा संघ दहाव्या स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्सचा संघ 8 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचे 10 गुण आहेत आणि ते आठव्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे आतापर्यत 13 सामने झाले आहेत त्यामध्ये त्यांनी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर 7 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.