Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेची आज अंतिम फेरी; महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा मिळणार

ही स्पर्धा फक्त मॅटवर खेळवली जात आहे. दरम्यान, आज अंतिम सामना खेळवला जाणार असून, या स्पर्धेचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार? याकडे आता सर्व कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 24, 2023 | 08:27 AM
पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेची आज अंतिम फेरी; महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा मिळणार
Follow Us
Follow Us:

सांगली : नुकतीच पुण्यात (Pune)  65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धा पार पडली. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत (Sangali) कालपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून, आज स्पर्धेचा अंतिम व शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेचा पहिला बहुमान मिळवण्यासाठी महिला कुस्तीपटू मैदानात घाम गाळत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकणाऱ्या महिला पहिलवानाची इतिहासात नोंद होणार आहे. कारण या स्पर्धेचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार? याकडे आता सर्व कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

स्पर्धा फक्त मॅटवर…

दरम्यान, कालपासून सांगलीत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६८, ७२ आणि ७६ वजनी गटातील मल्ल सहभागी आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी ६५ वजनी गटावरील महिला मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत ४५ जिल्ह्याचे संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा फक्त मॅटवर खेळवली जात आहे. दरम्यान, आज अंतिम सामना खेळवला जाणार असून, या स्पर्धेचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार? याकडे आता सर्व कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

ढिसाळ नियोजन, महिला कुस्तीपटूंची गैरसोय

पुरुषांच्या कुस्तीनंतर आता महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या स्पर्धेचं कोणतचं नियोजन नसल्यानं कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास 400 अधिक महिला कुस्तीगीर सांगलीत दाखल झालेत. मात्र कुस्ती स्पर्धांच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. ज्या क्रीडा संकुलाच्या आवारात कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाईट चालू नसल्याने अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावे लागतंय. याशिवाय या महिला कुस्तीपटूंचे जेवणाची सोय करण्यात आली होती, त्या ठिकाणी ही अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचे नियोजन पाहायला मिळालं. क्रीडा संकुलाच्या अत्यंत छोटयाश्या मेसमध्ये महिला कुस्तीगिरसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती, त्यामुळे रांगेत ताटकळत ठेवून या मुलींना आत सोडण्यात येत होतं. आसन व्यवस्था नसल्याने महिला कुस्तीपटूंना खाली बसून जेवण करावे लागेल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नीट नव्हती. जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी देखील कुस्तीगीर महिलांना पाण्याची व्यवस्था नव्हती, ढिसाळ नियोजन व महिला कुस्तीपटूंची गैरसोय होत असल्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Women maharashtra kesari tournament final round today the maharashtra kesari winner will get a silver mace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2023 | 08:27 AM

Topics:  

  • Kusti
  • Maharashtra Kesari
  • Pune
  • sangali

संबंधित बातम्या

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
1

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!
2

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?
3

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.