Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पराभवानंतर भंगले न्यूझीलंडचे T20 World Cup 2026 चे स्वप्न; तीन दिग्गज खेळाडूंचा निवृत्तीचा निर्णय, ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भावनिक निरोप

New Zealand cricketer Sophie Devine Suzie Bates Lea Tahuhu Retirement: गतविजेता न्यूझीलंड संघ महिला टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या पराभवाने संघाचा प्रवास संपुष्टात आला. या स्पर्धेतून तीन दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीही घेतली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 03:11 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • पराभवानंतर भंगले न्यूझीलंडचे T20 World Cup 2026 चे स्वप्न
  • तीन दिग्गज खेळाडूंनी घेतला निवृत्तीचा निर्णय
  • ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भावनिक निरोप
महिला टी-२० विश्वचषकाच्या (ICC Womens T 20 World Cup 2026) स्पर्धेत ‘ब’ गटातील दोन संघ सेमिफायनसाठी निश्चित झाले आहेत. शनिवारी (दि. २७ जून) झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून ९ विकेट्सने झालेल्या दारुण पराभवाने न्यूझीलंड संघ आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या गटातून इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने अव्वल चारमध्ये स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडसाठी हा केवळ एक निराशाजनक पराभव नव्हता तर न्यूझीलंड क्रिकेटच्या एका ऐतिहासिक आणि गौरवशाली युगाचाही अंत होता. या सामन्यानंतर संघाच्या तीन दिग्गज खेळाडू, सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स आणि लीया ताहुहू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सामन्यानंतर तिन्ही दिग्गज खेळाडू भावूक झाल्या होत्या. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांना गार्ड ऑफ ऑनरने भावनिक निरोप दिला.

IND vs IRE 2nd T20: लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाची परीक्षा; वैभवला मिळणार संधी? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

तीन दिग्गज एकाच वेळी निवृत्त

सोफी डेव्हाइन, सुझी बेट्स आणि लीया ताहुहू यांनी या स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी निवृत्ती जाहीर केली. न्यूझीलंड महिला क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या या तीन खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे. सुझी बेट्स न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. बेट्सने तिच्या ३७० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०,७२१ धावा करत विश्वविक्रम केला.

आपल्या ऐतिहासिक २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, सोफी डिव्हाईनने न्यूझीलंडसाठी एकूण ३१७ सामने खेळले. या काळात, तिने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२७९ धावा आणि टी-२० मध्ये ३८१७ धावा केल्या, ज्यात अनेक दमदार खेळींचा समावेश आहे. तिने २४१ विकेटही घेतले, ज्यामुळे ती सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होती. दुसरीकडे, किवी संघाची प्रमुख वेगवान गोलंदाज, लीया ताहुहूने आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत संघाचे २०७ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आणि २२५ विकेट्स घेतले.

गार्ड ऑफ ऑनरने भावनिक निरोप

हा ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आणखी खास करण्यासाठी, न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांतील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकत्र मैदानावर आले. सर्व खेळाडूंनी एक रांग तयार करून या तीन दिग्गज क्रिकेटपटूंना गार्ड ऑफ ऑनरने भावनिक निरोप दिला. खेळाला निरोप देताना तिन्ही खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते.

न्यूझीलंडचा दारुण पराभव

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ विकेट्स गमावून १६३ धावा केल्या. कर्णधार अमेलिया केरने ३४ चेंडूंत ४२ धावा करून संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. सोफी डिव्हाईनvs, तिच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात तीन षटकारांसह १४ चेंडूंत ३० धावा केल्या. सुझी बेट्सनेही चांगली फलंदाजी केली आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्यापूर्वी १३ चेंडूंत १९ धावा केल्या. मात्र, लीया ताहुहूला एकही विकेट मिळाला नाही.

FIFA World Cup 2026: Lionel Messi चा आणखी एक विश्वविक्रम! सलग ७ विश्वचषक सामन्यांत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू

Web Title: Womens t20 world cup 2026 england beat new zealand sophie devine suzie bates lea tahuhu retired from international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • ENG vs NZ
  • New Zealand
  • Sophie Devine

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.