
Women’s ODI World Cup: World Cup-winning Indian team arrives at Prime Minister Modi’s residence! History-making women welcomed in Delhi
Indian women’s team to meet Prime Minister Modi : २ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ५२ धावांनी पराभव केला. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक होताना दिसत आहे. विजेता भारतीय महिला संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाला आहे. भारतीय महिला संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे.
हेही वाचा : ICC Ranking: नाद करा ‘हिटमॅन’चा कुठं! 38 व्या वर्षीही रोहित शर्माचा पहिल्या स्थानी दबदबा; गिल आणि आझमला झटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद साजरा केला आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे भारतीय महिला संघाचे अभिनंदन संदेश शेअर केला आहे. त्यानंतर, भारतीय संघ आज, बुधवारी पंतप्रधानांची भेट घेणार आहे.
भारतीय महिला संघाचे दिल्लीत आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचे ढोल, फुले आणि जयजयकाराने स्वागत केले गेले. भारतीय संघानकडून केक कापून हा आपला ऐतिहासिक विजय साजरा करण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: World Cup-winning Indian Women’s Cricket Team reaches 7 LKM, the residence of Prime Minister Narendra Modi. Team India lifted its maiden ICC Women’s World Cup trophy on November 2. pic.twitter.com/U4KoP9TJJY — ANI (@ANI) November 5, 2025
पंतप्रधान मोदीं यांच्याकडून देखील सोशल मीडियावर संघाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी हा विजय देशाच्या कन्यांच्या शक्ती आणि स्वप्नांचा विजय असल्याचे वर्णन केले आहे. मोदी म्हणाले की, हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा एक क्षण आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, “महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा मोठा विजय. अंतिम फेरीतील त्यांची कामगिरी आश्चर्यकारक कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती. संपूर्ण स्पर्धेत संघाने असाधारण टीमवर्क आणि चिकाटी दाखवून दिली आहे. आमच्या खेळाडूंचे अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय भविष्यातील चॅम्पियन खेळाडूंना खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत राहील.”
महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या ५२ वर्षांच्या इतिहासात भारताने प्रथमच विजेतेपदावर नाव कोरले आहे. यापूर्वी, भारतीय संघ २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु तो त्यावेळी जेतेपदाने हुलकावणी दिली होती.