रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलिकडच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याच्या दमदार कामगिरीचा परिणाम आयसीसी क्रमवारीमध्ये देखील दिसून आला आहे. रोहित ७८१ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.तर अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रान ७६४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे, तर न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने ७४६ गुणांसह तिसरे स्थान गाठले आहे.
न्यूझीलंडचा फलंदाज मिशेल स्टार्कच्या प्रगतीनंतर, शुभमन गिल आणि बाबर आझम यांना प्रत्येकी एका स्थानाने मागे जावे लागले आहे. गिल आता ७४५ गुणांसह चौथ्या स्थानावरअसून बाबर आझम ७२८ गुणांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. दोन्ही फलंदाजांनी अलीकडे विशेष कामगिरी केलेली नसल्याने त्यांना त्याचा फटका बसला आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत, टी-२० आणि कसोटी क्रमवारीत कोणते देखीलमोठे बदल झालेले नाहीत. इंग्लंडचा जो रूट कसोटीत अव्वल स्थानी आहे तर तरुण भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा : पंजाबमध्ये ‘खेळ’ रक्तरंजित! लुधियानामध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या; ‘या’ टोळीने स्वीकारली जबाबदारी
शुभमन गिलने त्याच्या शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये २४, ९ आणि १० धावांच करू शकला. त्याला मोती खेळी करण्यात यश आले नाही. या तीन डावांमध्ये त्याने अर्धशतक किंवा शतक झळकावलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम देखील संघर्ष करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त ७ धावा केल्या होत्या. त्याआधी, तो वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ९ आणि ० धावाच करू शकला.






