फोटो सौजन्य : ICC
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका प्लेइंग 11 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा फायनलचा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजपासून ५ दिवस क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन होणार आहे. सर्व क्रिकेट चाहत्याचे मनोरंजन होणार आहे. पॅट कमिन्स आणि टेम्बा बवुमा हे आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेइंग 11 काय असणार आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर संघाची कमान ही पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली आहे. तर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन हे दोघे सलामीवीर फलंदाज म्हणुन मैदानात उतरणार आहे. तर कॅमरोन ग्रीन याला देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृती घेतलेला स्टिव्ह स्मिथ हा देखील प्लेइंग 11 चा भाग आहे. त्याचबरोबर स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ट्रॅव्हिस हेड हा देखील संघाचा भाग असणार आहे.
ब्यू वेबस्टर हा देखील संघाचा भाग असणार आहे, त्यामुळे मग ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठी फलंदाजी असणार आहे. संघाची विकेटकिपिंगची अलेक्स कॅरी करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लिऑन आणि सध्या कमालीच्या फाॅर्ममध्ये असलेला जोश हेझलवुड देखील संघाचा भाग असणार आहे.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमरोन ग्रीन, स्टिव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लिऑन, जोश हेझलवुड
दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग ११ बद्दल सांगायचे झाले तर एडन मार्क्ररम आणि रायन रिकल्टन हे दोघे सलामीवीर फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहेत. वियान मुल्डर याला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरेल. ट्रिस्टन स्टॅब्स हा आयपीएल 2025 मध्ये दमदार फॉर्ममध्ये होता त्याला कसोटीमध्ये स्थान मिळाले आहे.
डेविड बेन्डिंगम हा देखील संघामध्ये असणार आहे, विकेटकीपिंगची भूमिका कायले व्हेरेनने याच्याकडे असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर मार्को जान्सन, केशव महाराज आणि कगिसो रबाडा, लुंगी अंगिडी याचा समावेश आहे.
एडन मार्करम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेंबा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम , काइल वेरेने (विकेटकिपर), मार्को जेन्सेन, केशव महाराज, कागीसो रबाडा, लुंगी एनगिडी