एमी जोन्स(फोटो-सोशल मिडिया)
ICC Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडूंच्या ताज्या रँकिंग जाहीर केली आहे त्यामध्ये खेळाडूंच्या गुणात वाढ केली आहे. या दरम्यान, इंग्लंडच्या महिला यष्टीरक्षकाने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. ३१ वर्षीय खेळाडू एमी जोन्सने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत खोऱ्याने धावा केल्या आहेत. ज्याचा तिला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.
नवीन आयसीसी रँकिंगमध्ये एमी जोन्सने तीन स्थानांची झेप घेऊन ती सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर पोहचली आहे. तिने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक ठोकले आहे. या सामन्यात तिने ९८ चेंडूंचा सामना करत १२९ धावांची वादळी खेळी खेळली होती. ज्यामुळे ती ६८९ रेटिंग गुणांसह टॉप-५ फलंदाजांच्या यादीत पोहचली आहे.
एमी जोन्सबद्दल सांगायचे झाले तर, तिने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतके झळकावली आहेत. या दरम्यान, तिने दोन्ही वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील आपल्या नावे केला होता. यामुळेच इंग्लंडला मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० च्या फरकाने मोठा पराभव करता आला. अशाप्रकारे, जोन्सने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तसेच एमी जोन्सने वेस्ट इंडिज मालिकेत देखील तीन विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामध्ये १५ धावांत १ विकेट ही तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली होती. यानंतर, ती आयसीसी महिला एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहचली होती. या दरम्यान, तिला एका स्थानाचा फायदा मिळाला होता.
England stars gain in Women’s Rankings following heroics against West Indies at home 👏https://t.co/qLxOIKe8iA
— ICC (@ICC) June 10, 2025
हेही वाचा : SA vs AUS : World Test Championship च्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-११ ची घोषणा..
आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत, भारतीय खेळाडूंना देखील मोठा फायदा होताना दिसून येत आहे. आपल दीप्ती शर्माबद्दल बोलत आहोत. महिला एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत टीम इंडियाची खेळाडू दीप्ती शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडची अमेलिया केरला देखील तितक्याच स्थानांचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर आहे तर अमेलिया केरने क्रमवारीत पाचवे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅशले गार्डनरचे अव्वल स्थान कायम असून मिराजेन कप तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे आणि हेली मॅथ्यूज दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.