रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तो त्याच्या कामगिरीमुळे नाहीत तर त्याच्यावर लागलेला आरोपमुळे सध्या सातत्याने सोशल मीडियावर त्याचबरोबर देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मागील अनेक महिन्यांपासून तो सातत्याने वादामध्ये दिसत आहे, त्याच्यासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता त्याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. जयपुरमध्ये यश दयाल विरुद्ध बलात्कार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झाली आहे.
जयपूरमधील एका तरुणीने आरोप केला आहे की यश दयालने तिला क्रिकेटमध्ये करिअर बनवण्याचे आमिष दाखवून फसवले आणि भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून दोन वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी क्रिकेटपटूविरुद्ध एफआयआर नोंदवला. यश दयालवर लैंगिक शोषणाचा आरोप होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका मुलीने यशवर लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
मात्र, नंतर यश दयालला या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. क्रिकेटमुळे ती मुलगी आणि यश दयाल यांच्या संपर्कात आल्याचे कळले आहे. मुलीने आरोप केला आहे की, सुमारे दोन वर्षांपूर्वी ती अल्पवयीन असताना, दयालने तिला क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यश दयाल आयपीएल २०२५ चा सामना खेळण्यासाठी जयपूरला पोहोचला होता. तिथेही त्याने मुलीला एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
IND vs ENG 4th Test : भारताच्या गोलंदाजांना इंग्लिश फलंदाजांनी केली धुलाई! वाचा सामन्याचा अहवाल
भावनिक ब्लॅकमेल आणि सततच्या शोषणामुळे त्रासलेल्या पीडितेने तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहिल्यांदा बलात्कार झाला तेव्हा मुलगी अल्पवयीन होती. म्हणूनच पोलिसांनी दयालविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला. जयपूरपूर्वी गाझियाबादमधील एका मुलीने यश दयालवर लैंगिक शोषण, हिंसाचार आणि फसवणुकीचा आरोप केला होता. पीडितेने सोशल मीडियावर पोस्ट करत क्रिकेटपटूवर कारवाईची मागणी केली होती. पीडितेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांकडे न्यायाची याचना केली होती. एवढेच नाही तर पीडितेने यश दयालसोबतचा तिचा फोटोही शेअर केला होता.
पीडितेने दावा केला की ती यश दयालसोबत पाच वर्षांपासून प्रेमसंबंधात होती. यशने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले. यश दयालने मुलीची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली, परंतु लग्न पुढे ढकलत राहिला. एका क्षणी, पीडितेला क्रिकेटपटू तिची फसवणूक करत असल्याचा संकेत मिळाला आणि तिने विरोध करण्यास सुरुवात केली.