
फोटो सौजन्य - JioHotstar
Yashasvi Jaiswal’s century : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने दोन सामन्यांपैकी 1 सामना जिंकला आहे. आज सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये शुभमन गिलला मागील अनेक महिन्यापासून टी20 संघामध्ये स्थान मिळाले आहे पण तो आतापर्यत फार काही चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याआधी सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे फलंदाजी करायचे पण बऱ्याच महिन्यापासून त्याला भारतीय टी20 संघामधून वगळण्यात आले आहे.
सध्या यशस्वी जयस्वाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे आणि आता त्याने दमदार कामगिरी करुन निवडकर्त्याचे लक्ष वेधले आहे. यशस्वी जयस्वालच्या धमाकेदार शतकामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणाविरुद्ध धावांचा जबरदस्त पाठलाग केला. मुंबईने हरियाणाविरुद्ध २३५ धावांचे लक्ष्य अवघ्या १७.३ षटकात पूर्ण केले, जे स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक यशस्वी धावांचे लक्ष्य आहे. जयस्वालच्या शतकामुळे निवडकर्त्यांचीही झोप उडली आहे. टी-२० क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक असूनही, त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही.
4th T20 Century for Yashasvi Jaiswal 🔥👏 While Chasing the Target of 235 in Syed Mushtaq Ali Trophy! pic.twitter.com/J5OPIhQ23X — 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) December 14, 2025
भारतीय व्यवस्थापन शुभमन गिलला तंदुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आगामी टी-२० विश्वचषकात भारताला जयस्वालसारख्या फलंदाजांची गरज आहे. प्रथम फलंदाजी करताना हरियाणाने निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून २३४ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने केवळ ४८ चेंडूत शतक झळकावले. त्याने ५० चेंडूत १६ चौकार आणि एका उत्तुंग षटकारासह १०१ धावा केल्या.
यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त, सरफराज खाननेही या धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने २५ चेंडूत ६४ धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये त्याने नऊ चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २५० पेक्षा जास्त होता.
२३६- झारखंड (विरुद्ध पंजाब, २०२५)
२३५- मुंबई (विरुद्ध हरियाणा, २०२५)*
२३० मुंबई (विरुद्ध आंध्र, २०२४)
२२७- पुदुच्चेरी (विरुद्ध आंध्र, २०२१)
२२३- बडोदा (विरुद्ध पंजाब, २०२५)
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरियाणाकडून कर्णधार अंकित कुमारने ८९ धावा केल्या. निशांत संधूनेही ६३ धावा केल्या. परंतु, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.