फोटो सौजन्य - सोनी लिव्ह सोशल मिडिया
India vs Pakistan U19 asia Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया कप सामना सुरु आहे. हा सामना दुबईमधील एसीसी अॅकाडमी मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना हा पावसामुळे उशीरा सुरु झाला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला सुरुवातीच्या खेळामध्ये मोठा धक्का बसला आहे. आतापर्यत भारताच्या संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा आणि आयपीएल स्टार वैभव सुर्यवंशी हा या सामन्यात स्वतात बाद झाला. त्याने या सामन्यामध्ये फक्त 5 धावा केल्या आणि तो झेल बाद झाला. आयुष म्हात्रे याने भारताच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. वैभव सुर्यवंशी याने मागील सामन्यामध्ये 171 धावांची खेळी खेळली होती. पण तो या सामन्यामध्ये फार काही काही चांगली कामगिरी करु शकला नाही. सध्या भारतीय संघासाठी टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि आरोन जाॅर्ज हे दोघे फलंदाजी करत आहेत.
भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती. यूएईला पराभूत करुन सध्या भारताचा संघ गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे. याचे कारण म्हणजेच पाकिस्तानचा रन रेट जास्त असल्यामुळे संघ पहिल्या स्थानावर गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे.
Vaibhav Suryavanshi, who’s been in fine form, falls early in this encounter against Pakistan. ❌👀#U19AsiaCup #VaibhavSuryavanshi #Sportskeeda pic.twitter.com/1doCE77jOd — Sportskeeda (@Sportskeeda) December 14, 2025
भारताला पहिला मोठा धक्का वैभव सूर्यवंशी (5) च्या रूपात 29 धावांवर बसला. भारत आणि पाकिस्तान दोघेही त्यांचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर येथे येत आहेत. टीम इंडियाने UAE ला 234 धावांनी हरवले, तर पाकिस्तानने मलेशियाला 297 धावांनी हरवले. आजचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत आपले तिकीट निश्चित करेल. तिसऱ्या क्रमांकावर येत असलेला आरोन जॉर्ज क्लासिक शैलीने फलंदाजी करत आहे. तो उत्कृष्ट वेळेसह त्याचे शॉट्स मारत आहे. आतापर्यंत त्याने सहा चौकारांच्या मदतीने २७ धावांचा वैयक्तिक स्कोअर गाठला आहे. दरम्यान, आयुष म्हात्रे ३८ धावा करून खेळत आहे.






