
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs Sri Lanka Womens 5th T20 match Live Streaming : भारतीय महिला संघाची सध्या श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेचा काल चौथा सामना खेळवण्यात आला. या मालिकेच्या चौथ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 30 धावांनी विजय मिळवून मालिकेमध्ये 4-0 अशी आघाडी घेतली आहे आणि त्यांचा दबदबा पाहायला मिळाला. मालिकेचा चौथा सामना हा झाल्यानंतर आता मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना शिल्लक आहे. या सामन्यामध्ये भारताचा संघ विजय मिळवून श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.
चौथ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. या सामन्यामध्ये भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत रेकाॅर्ड ब्रेकिंग पार्टनरशीप केली. तर रिचा घोष हिची हार्डहिटींग फलंदाजी देखील पाहायला मिळाली. कालच्या या हाय स्कोरींग सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 221 धावांचा डोंगर उभा करुन नवा रेकाॅर्ड नावावर केला होता. पाचव्या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंगचा तपशील आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
भारतीय महिला संघ श्रीलंकेविरुद्ध मालिकेचा पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता खेळला जाईल. नाणेफेक अर्धा तास आधी होईल. दोन्ही संघांमधील पाचवा सामना ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम तिरुवनंतपुरम येथे खेळवण्यात येणार आह्. पाचव्या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर चामारी अथापथ्थू श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाचवा टी-२० सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल. सामना मोफत पाहण्यासाठी, क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या फोनवर जिओ हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल आणि नंतर सामना पाहण्यासाठी फक्त डेटा वापरावा लागेल. त्यानंतर, ते आरामात सामना मोफत पाहू शकतील. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही हा सामना लाईव्ह प्रसारित केला जाईल.
आतापर्यतच्या भारतीय संघाच्या या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर भारतीय संघासाठी ही मालिका स्वप्नाहून कमी नाही. भारतीय महिला संघाचा हा शेवटचा 2025 चा सामना असणार आहे. त्यानंतर भारतामध्ये महिला प्रिमियर लीगला सुरुवात होणार आहे. यासाठी सध्या भारतीय क्रिकेट संघातील त्याचबरोबर विदेशी खेळाडू देखील सहभागी होणार आहेत.