Who is the laziest player in the Indian team? Do you know?, Yuvraj Singh himself made a big revelation..
Yuvraj Singh : युवराज सिंग आपल्या धाकड अंदाज सर्वांनाच माहिती आहे. भारतासाठी खेळतान त्याने २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा विश्वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका वठवली होती. अशा परिस्थितीत, जर तो काही बोलला तर त्याच्या हेडलाईन बनत असतात. अशातच आता युवराज सिंगने एक खळबळजनक दावा केला आहे. एका खास संभाषणादरम्यान ४३ वर्षीय यूवराजकडून काही मनोरंजक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये त्याने त्याचा जवळचा मित्र आणि भारताचा माझी वेगवान गोलंदाज झहीर खानबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्याने माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानला टीम इंडियाचा सर्वात आळशी खेळाडू असल्याचे म्हटले आहे.
युवराज सिंगला एका संभाषणादरम्यान ‘रॅपिड फायर’ गेम अंतर्गत काही भारतीय खेळाडूंबद्दल त्याचे मत विचारण्यात आले होते. ज्याचे युवराजने एकदम आपल्या शैलीत स्पष्टपणे उत्तरं दिली आहेत. युवराज सिंगला जेव्हा एका ओळीत हरभजन सिंगबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने भज्जीचे वर्णन आक्रमक असे केले आहे. तसेच रोहित शर्माला आळशी, राहुल द्रविडचे कठोर असे वर्णन केले आहे. अँड्र्यू फ्लिंटॉफला करिश्माई म्हटले आहे, ख्रिस गेलला चमकणारा म्हणून उल्लेख केला आहे. एमएस धोनी थाला, तसेच विराट कोहलीला किंग कोहली, सचिन तेंडुलकरला सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि एक चांगला माणूस म्हणून संबोधले आहे, शुभमन गिलला स्मार्ट म्हणून त्याचे कौतुक केले आहे. तसेच हार्दिक पंड्याला गेम चेंजर असे म्हटले आहे.
हेही वाचा : Virat Kohli चा किलर लुक, महिला वर्ग घायाळ! पत्नी अनुष्कासह दिसून आला ‘किंग’ कोहली, पहा व्हिडिओ
त्यांनंतर युवराज सिंगला विचारण्यात आले की, सर्वात मोठा खवय्या कोण आहे? त्याला उत्तर देताना त्याने क्रीडा जगतात ‘क्रिकेटचा देव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरचे नाव उच्चारले. मोठ्या सामन्यापूर्वी उशिरा उठणाऱ्या खेळाडूबद्दल सांगताना त्याने प्रथम झहीर खानचे नाव घेतले. पण नंतर स्वताला सावरत त्याने आपली आपली चूक सुधारत आशिष नेहरासाठी हे असल्याचे सांगितले.
पुढे जेव्हा अँकरने विचारले की, झहीर खानचे नावही या यादीत आहे का? तर त्याने उत्तर देताना म्हटले की, ‘झहीर खान हा खूपच आळशी आहे.’ युवराजच्या या उत्तरावर अँकरलाही हसू आवारता आले नाही. तो इथेच न थांबता त्याने झहीर खान हा ‘अतिरिक्त आळशी’ आहे असे सांगून विषय संपवला.