नीरज चोप्रा(फोटो-सोशल मीडिया)
Diamond League : भारत देशासाठी दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा शुक्रवारी त्याच्या डायमंड लीग मोहिमेची सुरुवात करणार आहे. तसेच तो वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद राखण्यावर नीरज चोप्राचे लक्ष असणार आहे. दो हा येथे भारतीयांची मोठी उपस्थिती असल्याने चोप्रा यांना भरपूर पाठिंबा मिळणार अस्लयचे बोलेल जात आहे. नीरज चोप्राचा सामना दोन वेळा विश्वविजेता ठरलेला आणि २०२४ च्या ऑलिंपिक कांस्यपदक विजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, चेक प्रजासत्ताकचा जाकुब वडलेश, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि मॅक्स डेहनिंग, केनियाचा ज्युलियस येगो आणि जपानचा रॉडरिक जंकी डीन यांच्याशी होणार आहे. हे सर्वजण नेहमीच मोठ्या स्पर्धांमध्ये चोप्राचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत.
पॅरिस ऑलिंपिक २०२४ सुवर्णपदक विजेता ठरलेला पाकिस्तानचा अर्शद नदीम या स्पर्धेत सहभागी होणार नाहीय आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता भारताचा किशोर जेना देखील ११ स्पर्धकांमध्ये सहभागी असणार आहे. जेनाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ८७.५४ मीटर अशी राहिली आहे. जी गेल्या वेळी येथे ७६.३१ मीटर फेकून नववे स्थान पटकावले होते. येथे वडलेशने ८८.३८ मीटर लांब थ्रो करून विजेतेपद जिंकले. चोप्रा दोन सेंटीमीटर मागे राहिला होता. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिसमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या चोप्राने २०१८ मध्ये येथे पहिल्यांदा डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता आणि चौथे स्थान पटकावले होते.
हेही वाचा : IPL 2025 : Mumbai Indians संघात नव्या पाहुण्याची एंट्री! कधी काळी आपल्या बॅटने गाजवला होता पूर्ण IPL हंगाम..
चोप्राची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ८९.९४ अशी राहिली आहे आणि यावेळी त्याला ९० मीटरचा अडथळा पार करायचा आहे. झेलेंजीची सर्वोत्तम कामगिरी ९८. ४८ मीटर अशी राहिली होती. राष्ट्रीय विक्रमधारक गुलवीर सिंग आणि पारुल चौधरी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या ५००० मीटर आणि ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घेणार आहेत. चोप्रा, पीटर्स, येगो, डीन आणि जेना हे २४ मे रोजी बंगळुरूमध्ये नीरज चोप्रा क्लासिक खेळणार होते. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. चोप्रा त्यानंतर पोलंडमध्ये ऑर्लेन जनुझ कुसोसिंकी मेमोरियल टूर्नामेंट खेळणार आहे, तो २४ जूनपासून चेक प्रजासत्ताकमध्ये होणाऱ्या गोल्डन स्पाइक २०२५ मध्ये सहभागी होईल.