Yuzvendra Chahal : टी-20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक विक्रम; 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय, सौजन्य : आयएएनएस
Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटमधील अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट 2026 स्पर्धेत तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात 400 विकेट्स घेण्याची किमया चहलने केली आहे.
भारतीय क्रिकेटमधील अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याने टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट 2026 स्पर्धेत तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात चहलने ही ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हरियाणाने तमिळनाडूचा 7 विकेट्सने पराभव केला.
इंदूर येथील डेली कॉलेज मैदानावर झालेल्या ग्रुप-बी सामन्यात चहलने 4 षटकांत अवघ्या 16 धावा देत 3 फलंदाजांना माघारी धाडले. या कामगिरीसह त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 402 विकेट्स जमा झाल्या आहेत. त्याने 346 टी-20 सामन्यांत ही कामगिरी केली आहे.
भारतीय गोलंदाजांच्या टी-20 विकेट्सच्या यादीत चहल अव्वल स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमार 366 विकेट्ससह दुसऱ्या, तर जसप्रीत बुमराह 354 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीयूष चावला (329) आणि रविचंद्रन अश्विन (323) हे पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये आहेत.
MS Dhoni Retirement: ‘…तो क्षण अजूनही आठवतो’ धोनीच्या निवृत्तीवर क्रिकेटच्या ‘देवा’ची भावूक पोस्ट
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तमिळनाडूचा संघ 19.5 षटकांत 124 धावांवर सर्वबाद झाला. बालासुब्रमण्यम सचिनने 27, अमित सात्विकने 38, तर कर्णधार साई किशोरने 19 धावांचे योगदान दिले. शाहरुख खानने 22 धावा केल्या. हरियाणाकडून चहल आणि निशांत संधू यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरियाणाने 16.1 षटकांत तीन विकेट्स गमावत विजय मिळवला. कर्णधार अंकित कुमारने 43 धावांची खेळी केली, तर निशांत संधूने नाबाद 37 धावा केल्या. यशवर्धन दलालने 21 धावांचे योगदान दिले.
या विजयासह हरियाणाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र, या सामन्याचे सर्वाधिक आकर्षण ठरला तो युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक 400 विकेट्सचा टप्पा. ज्यामुळे या सामन्याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
Ans: युजवेंद्र चहल हा टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
Ans: चहलने 4 षटकांत 16 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.
Ans: भुवनेश्वर कुमार 366 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.






