Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

चहलने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा खेळण्याचे आश्वासन देत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 02, 2025 | 08:00 PM
युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! (Photo Credit- X)

युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय
  • भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार
  • ऑगस्ट २०२३ मध्ये खेळला होता शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना
Yuzvendra Chahal: भारतीय संघासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजावणारा लेग-स्पिनर युझवेंद्र चहल पुनरागमनासाठी अथक परिश्रम घेत आहे. चहलने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा खेळण्याचे आश्वासन देत आहे. चहलने २०२६ च्या काउंटी चॅम्पियनशिप हंगामासाठी नॉर्थम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबशी करार केला आहे.

काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणार

युझवेंद्र चहल गेल्या दोन वर्षांपासून नॉर्थम्प्टनशायरकडून खेळत आहे. नॉर्थम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये सलग तिसऱ्या हंगामासाठी करारबद्ध झाल्याची घोषणा केली. चहलने यापूर्वी गेल्या दोन काउंटी चॅम्पियनशिप हंगामात नॉर्थम्प्टनशायरकडून ३१ बळी घेतले होते.

हे देखील वाचा: ‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

तिसऱ्या हंगामासाठी चहलला करारबद्ध केल्याची घोषणा करताना नॉर्थम्प्टनशायरने म्हटले आहे की, सात वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी २१७ बळी घेतलेल्या भारतीय फिरकी गोलंदाजाची निवड केल्याने आगामी हंगामात त्यांच्या संघाला मोठा फायदा होईल.

चहलने ऑगस्ट २०२३ मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला

यजुवेंद्र चहलने सलग तिसऱ्या हंगामात नॉर्थम्प्टनशायरसाठी करार केल्यानंतर आनंद व्यक्त करताना म्हटले की, “नॉर्थम्प्टनशायरकडून पुन्हा एकदा खेळताना मला आनंद होत आहे. ते माझे दुसरे घर बनले आहे आणि मला येथे खेळण्याचा खरोखर आनंद आहे.” चहलने ऑगस्ट २०२३ मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि अद्याप तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकलेला नाही. चहलने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९६ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १२१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चहलचा चेंडूसह विक्रम पाहिला तर त्याने ४४ सामन्यांमध्ये ३४.९४ च्या सरासरीने १२७ विकेट्स घेतल्या आहेत.

हे देखील वाचा: रेकाॅर्ड तोड फलंदाजी! 180 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच; 820 धावांचा विक्रम, या संघाची ऐतिहासिक कामगिरी

Web Title: Yuzvendra chahals big decision signed a contract to play with this foreign team in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर
1

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी  कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन
2

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन

पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाने उघडले PCB चे काळे सत्य! पद सोडण्याचे खरे कारण केले उघड, वाचा सविस्तर
3

पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाने उघडले PCB चे काळे सत्य! पद सोडण्याचे खरे कारण केले उघड, वाचा सविस्तर

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल
4

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.