फोटो सौजन्य – X
काउंटी क्रिकेट : काउंटी क्रिकेटला सुरुवात झाली आहे, भारताचे असे अनेक खेळाडु आहेत ज्यांना टीम इंडीयामध्ये स्थान मिळाले नाही ते या स्पर्धेमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये इशान किशन, खलील अहमद अशा भारताच्या प्रसिद्ध क्रिकेट खेळाडुं या स्पर्धेमध्ये सामील झाले आहेत. सरे काउंटी क्रिकेट क्लबने ३० जून २०२५ रोजी इतिहास रचला. त्यांनी डरहम विरुद्ध काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वन सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ८२०/९ धावांवर डाव घोषित केला. क्लबच्या इतिहासातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती.
१८० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात सरे काउंटी क्रिकेट क्लबने एवढा मोठा धावसंख्या उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी १८९९ मध्ये ८११ धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात आली होती. अशाप्रकारे, या मैदानावर सॉमरसेटविरुद्ध आलेला १२६ वर्षांचा जुना विक्रम मोडला गेला. एकिकडे भारताचा संघ इंग्लडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप खेळत आहे, यामध्ये सरे काउंटी क्रिकेट क्लबच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ८२० धावा केल्या आणि डाव घोषित केला.
या संघाच्या ४ फलंदाजांनी शतके झळकावली आणि यातील एका खेळाडूने त्रिशतक झळकावले. क्रिकेचा जन्म हा 180 वर्षापुर्वी झाला होता, या क्रिकेट्च्या इतिहासामध्ये 800 हुन अधिक धावा करुन संघाने डाव घोषित केला हे पहिल्यांदाच झाले, या इनिंगची इतिहासात नोंद झाली आहे. ओव्हल येथे डरहम विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सरेचा सलामीवीर डोम सिब्ली (Dom Sibli Triple Century) ने ४७५ चेंडूमध्ये शानदार ३०५ धावा बोर्डवर लावल्या. त्याने त्याच्या डावात २९ चौकार आणि २ षटकार मारले, जे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक होते.
केवळ सिब्लीच नाही तर संघाच्या इतर फलंदाजांनीही ही धावसंख्या उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॅन लॉरेन्सने १४९ चेंडूत १७८ धावा केल्या, तर सॅम करनने १२४ चेंडूत १०८ धावा केल्या. विल जॅक्सनेही ९४ चेंडूत ११९ धावा केल्या, ज्यात ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, डरहमच्या गोलंदाजांना हा स्कोअरबोर्ड पाहणे खूप कठीण होते. जॉर्ज ड्रिसेलने ४५ षटकांत १ विकेटसाठी २४७ धावा दिल्या, जो त्याच्यासाठी खूप कठीण स्पेल होता. सरे संघाने त्यांचा पहिला डाव ९ विकेटच्या मोबदल्यात ८२० धावांवर घोषित केला. आज, म्हणजे १ जुलै २०२५ रोजी या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळापर्यंत डरहम संघाने १ विकेटच्या मोबदल्यात ५९ धावा केल्या आहेत. सध्या ते सरे संघापेक्षा ७६१ धावांनी मागे आहेत.