या एका पासवर्डवर 76 हजार भारतीयांचा विश्वास! एका सेकंदात क्रॅक करतील Hackers, लुटतील तुमचे लाखो रुपये
सध्याच्या डिजिटल काळात आपल्या सोशल मीडियापासून बँकिंगपर्यंत सुरक्षेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासवर्ड. पासवर्ड आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवतो. ऑनलाईन सुरक्षेसाठी पासवर्ड अत्यंत गरजेचा आहे. तसेच हा पासवर्ड स्ट्राँग असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र आता असं समोर आलं आहे की आजच्या काळातही लाखो भारतीय असे आहेत जे अगदी सामान्य पासवर्डचा वापर करतात आणि हे पासवर्ड हॅकर्स अगदी सहज क्रॅक करू शकतात.
अलीकडे समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा खुलासा करण्यात आला आहे की 76 हजारहून अधिक भारतीय एकाच पासवर्डचा वापर करतात. हा पासवर्ड इतका सामान्य आहे की हॅकर्स हा पासवर्ड अगदी काही सेकंदात क्रॅक करू शकतात आणि तुमची माहिती आणि तुमचे पैसे चोरी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर
सायबर सिक्युरिटी रिसर्चर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार हा पासवर्ड इतका सामान्य आहे की याचा सहज अंदाज लावला जाऊ शकतो आणि सर्वात कमजोर पासवर्डच्या यादीमध्ये हा पासवर्ड अव्वल स्थानावर आहे. रिपोर्टनुसार भारतातील हजारो लोक आजच्या काळातही 123456 या सामान्य पासवर्डचा वापर करतात. हा पासवर्ड इतका कॉमन आहे की हॅकर्स अगदी काही क्षणातच तुमचा पासवर्ड ओळखू शकता. हा पासवर्ड ब्रूट फोर्स किंवा डिक्शनरी अटॅक यांसारख्या पद्धतीने लगेचच क्रॅक केला जाऊ शकता.
जर तुम्ही ही तुमच्या सोशल मीडिया किंवा बँकिंग अकाउंटसाठी या सामान्य पासवर्डचा वापर करत असाल तर तुम्ही अप्रत्यक्षपणे हॅकर्सना आमंत्रण देत आहात. हॅकर्स अगदी सहज तुमच्या पासवर्डचा अंदाज लावून तुमचा ईमेल, सोशल मीडिया, बँकिंग आणि ऑनलाइन शॉपिंग अकाउंट हॅक करू शकतात. ज्यामुळे तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाईल आणि तुमच्या या माहितीचा दूरुपयोग केला जाण्याची देखील शक्यता आहे.
सहसा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी एका सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. त्याला फास्ट ट्रॅकिंग टाईम असं हॅकर्स सध्याच्या काळात असे ऑटोमॅटिक टूल्स वापरतात त्यामुळे लाखो पासवर्ड क्षणातच क्रॅक केले जाऊ शकतात. तसेच पासवर्ड लिंक झाल्यानंतर देखील तुमचे अकाउंट हॅक होण्याचा धोका असतो.
भारतीय यूजर्स सहसा सोप्या पासवर्डची निवड यासाठी करतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या अकाऊंटचा पासवर्ड लक्षात राहावा. “123456”, “password”, “india123” किंवा “abcd1234” पासवर्ड लवकर टाईर केले जाऊ शकतात. मात्र यामुळे हॅकर्स तुमचे अकाऊंट अगदी सहज क्रॅक करू शकतात.