Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

स्मार्टफोन आणि इंटरनेटप्रमाणेच आता AI देखील आपल्या रोजच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकजण AI ला त्यांचा मित्र मानतात आणि त्याच्यासोबत अनेक गोष्टी शेअर करतात. पण AI बाबत आता वैज्ञानिकांनी भविष्यवाणी केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2025 | 11:45 AM
सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी AI चा वापर करताय का? म्हणजे अगदी एखाद्या विषयावरील माहिती शोधण्यापासून ट्रिप प्लॅन करण्यापर्यंत AI तुम्हाला सर्व कामांत मदत करतो. AI वरून अनेक लोकं कंटेट देखील कॉपी पेस्ट करतात. म्हणजेच AI ने दिलेली माहिती तुम्ही देखील तशीच शेअर करत आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Zoho कॉरपोरेशचे के को-फाउंडर आणि चीफ साइंटिस्ट श्रीधर वेम्बू यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करणाऱ्या टेक प्रोफेशनल्ससाठी एक इशारा जारी केला आहे. त्यांनी याबाबत त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट देखील शेअर केली आहे.

Free Fire Max: यूनिक Gloo Wall Skin फ्रीमध्ये मिळवण्याची हीच योग्य संधी, नवीन कोड्स क्लेम करताच मिळणार भरगोस रिवॉर्ड्स

AI वर पूर्णपणे अवलंबून राहताय?

श्रीधर वेम्बू यांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही AI चा योग्य वापर केला तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकता आणि तुमच्या कामाची गती देखील वाढू शकते. मात्र जर तुम्ही AI वर पूर्णपणे अवलंबून राहिलात किंवा त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलात तर ही एक गंभीर बाब आहे. यामुळे प्रोडक्टिविटीमध्ये घट होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)

AI ला माणसांची जागा देऊ नका

श्रीधर वेम्बू यांनी म्हटलं आहे की, “ AI उत्पादनाचा अनुभव सुधारू शकते, जसे की X मधील Grok करतो. पण मी त्यातून नवीन कंटेंट तयार करण्याच्या बाजूने नाही. कस्टमर सपोर्टचा विचार केला तर, ते एजेंट्सना जलद काम करण्यास मदत करते परंतु या सर्वांमुळे AI ला माणसांची जागा देणे योग्य नाही. सर्वात चुकीची गोष्ट म्हणजे AI ने लिहिलेला टेक्स्ट ग्राहकांना न कळवता पाठवणे.

एक्स पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

अगस्त 2025 मध्ये X वर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये श्रीधर वेम्बू यांनी म्हटलं आहे की, मी रोज दोन ते तीन वेळा AI चॅट टूल्सचा वापर करतो. मी माझ्या फोनमध्ये टॉप-5 AI अ‍ॅप्स इंस्टॉल केले आहेत. मी AI चा “मॉडरेट ते हेवी यूजर” आहे. AI मुळे माझी वेब सर्चिंग 80% पर्यंत कमी झाली आहे. कारण AI म्हणजे वेगाने शिकण्याची पद्धत आहे.

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

AI वर आंधळा विश्वास ठेऊ नका

वेम्बू यांनी सांगितल्याप्रमाणे, AI ग्राहक सेवा जलद बनवू शकते. परंतु AI पूर्णपणे मानवांची जागा घेऊ शकत नाही. त्यांनी असेही म्हटले की AI ने लिहिलेला कोड थेट वापरणे धोकादायक आहे. त्यासाठी कठोर कंप्लायंस, गोपनीयता आणि सिक्योरिटी रिव्यू करणे आवश्यक आहे. जर ही प्रक्रिया वगळली तर डेवलपर्स अव्यावसायिकपणे वागतील. त्यांच्या मते, काही प्रकरणांमध्ये AI ने दिलेला कंटेट आपला वेळ वाचवू शकतो. पण त्यामुळे आपला विकास आणि वेब सर्चिंग देखील कमी होऊ शकते. प्रोडक्टिविटीमध्ये घट होऊ शकते. वेम्बू यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, Zoho त्यांच्या प्रोग्रामरना शिकण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी AI चा वापर करण्यास प्रोत्साहित करते. परंतु मानवी निर्णय घेण्याची क्षमता AI द्वारे बदल शकत नाही.

Web Title: It is dangerous to copy paste content from ai platform scientist give waring tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर
2

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
3

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
4

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.