
TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर
AI व्हॉईस असिस्टंट असे सॉफ्टवेयर प्रोग्राम असतात जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मानवी आवाज ओळखून प्रतिसाद देतात. हे टूल जनरल व्हॉईस असिस्टेंट आणि स्पेशलाइज्ड व्हॉईस असिस्टेंट अशा दोन कॅटेगरीमध्ये उपलब्ध असतात. जनरल असिस्टेंट प्रश्नांची उत्तरे देणे आणि इतर आवश्यक टास्क पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. गूगल असिस्टेंट आणि अलेक्सा याचे उदाहरण आहे. तर स्पेशलाइज्ड असिस्टेंट खास इंडस्ट्री किंवा फील्डसाठी तयार केले आहे. ज्याचा वापर ठराविक लोकांद्वारे केला जातो. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हॉईस असिस्टेंट नॅचुलर लँग्वेज प्रोसेसिंग (NLP), मशीन लर्निंग (ML) आणि स्पीच रिकग्नेशन टेक्नोलॉजीजचा वापर करते. हे टूल मानवी आवाज ओळखून प्रतिसाद देतात. AI व्हॉईस असिस्टेंट सर्वात आधी युजरचे शब्द ओळखते. यासाठी अॅडवांस्ड एल्गोरिद्म काम करते, ज्यामुळे बॅकग्राऊंड आवाज कमी होतो आणि केवळ आवाजावर फोकस केला जातो. जेव्हा सिस्टीम तुमचा आवाज ओळखते तेव्हा संभाषण टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट केले जाते. यानंतर AI नॅचुलर लँग्वेज अंडरस्टेंडिंगच्या मदतीने कॉन्टेक्स्टच्या हिशोबाने अर्थ समजते. कमांड समजल्यानंतर अस्टिस्टंट अॅक्शन घेतात. इथे तुमची मागणी पूर्ण केली जाते. जर तुम्ही दिलेले टास्क पूर्ण केले नाही तर तुम्ही पुन्हा कमांड देऊ शकता. या संपूर्ण प्रक्रियेत मशीन लर्निंग देखील सुरू असते.
Ans: AI Voice Assistant हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित डिजिटल सहाय्यक आहे, जो आवाजाच्या माध्यमातून वापरकर्त्याचे प्रश्न समजून उत्तर देतो व कामे करतो.
Ans: तो व्हॉइस रिकग्निशन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) आणि मशीन लर्निंग वापरून तुमचा आवाज ओळखतो आणि योग्य प्रतिसाद देतो.
Ans: गुगल असिस्टंट, सिरी, अलेक्सा, सॅमसंग बिक्सबी हे लोकप्रिय एआय व्हॉइस असिस्टंट आहेत.