
Tech Tips: स्मार्ट ग्लासेस खरेदी करताय? थांबा, घाई नको! 'हे' फीचर्स दुर्लक्षित केले तर पश्चात्ताप होईल
Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या
स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गरजा लक्षात घेणे गरजेचे आहे आणि त्यानुसार तुम्ही डिव्हाईस निवडू शकता. सध्या ऑडियो ओनली, कॅमेरा-इक्विप्ड स्मार्ट ग्लासेस आणि डिस्प्ले-बेस्ड स्मार्ट ग्लासेस बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्हाला केवळ गाणी ऐकण्यासाठी आणि कॉलिंग मॅनेज करण्यासाठी डिव्हाईस पाहिजे आहे तर तुम्ही ऑडियो ओनली स्मार्ट ग्लासची निवड करू शकता. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्ही कैमरा-इक्विप्ड ग्लासेस खरेदी करू शकता. तर डिस्प्ले बेस्ड स्मार्ट ग्लासेस तुमच्या स्मार्टफोनसाठी एक चांगला पर्याय बनतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला डिझाईन आणि फिनिशिंगवर लक्ष देणे गरजेचे आहे. यापूर्वी स्मार्ट ग्लासेस अत्यंत जड होते, ज्यामध्ये मोठ्या फ्रेम असायच्या. मात्र आता डिझाईन बरेच बदलले आहे. स्मार्ट ग्लासेस सामान्य चष्म्यांप्रमाणे दिसू लागले आहेत. असे असले तरी देखील डिव्हाईस खरेदी करताना डिझाईन आणि फिनिशिंगवर लक्ष देणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला दीर्घकाळ स्मार्ट ग्लासेसचा वापर करायचा असेल तर त्यांचे वजन अत्यंत कमी असले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला वजन जाणवणार नाही. 50 ते 55 ग्रॅमपेक्षा अधिक वजन असणारे स्मार्ट ग्लासेस नाक आणि कानावर अत्यंत जड वाटू लागतात. यामुळे स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्यापूर्वी त्याचे वजन बघणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला आधीच चष्मा असेल तर स्मार्ट ग्लासेस प्रिस्क्रिप्शन लेंसेला सपोर्ट करतात की नाही हे पाहणे गरजेचे आहे. यासोबतच ब्रँड अशा प्रकारचे लेन्स ऑफर करत आहे का याची चौकशी करणे देखील आवश्यक आहे. कारण फ्रेममध्ये लोकल ऑप्टिकलकडून लेंस फिट करण्यासाठी जास्त खर्च येऊ शकतो.
स्मार्ट ग्लासेसमधील बॅटरी लाईफ अद्याप अधिक अपडेट करण्यात आली नाही. कंपन्या बॅटरीवर काम करत आहेत. सर्व फीचर्स वापरताना प्रगत मॉडेल्स देखील पूर्ण दिवसाची बॅटरी लाईफ देऊ शकत नाहीत. म्हणून, तुमच्या गरजेनुसार चांगली बॅटरी लाईफ असलेले स्मार्ट ग्लासेस निवडा.
Ans: Smart Glasses हे इंटरनेट, कॅमेरा, ऑडिओ आणि AI टेक्नॉलॉजीसह येणारे स्मार्ट चष्मे आहेत, जे स्मार्टफोनसारखी अनेक कामे करू शकतात.
Ans: Smart Glasses मध्ये ब्लूटूथ/Wi-Fi, सेन्सर्स, मायक्रोफोन, स्पीकर्स आणि AI सॉफ्टवेअर असते, ज्यामुळे ते फोनशी कनेक्ट होऊन माहिती दाखवतात किंवा आवाजाद्वारे कमांड घेतात.
Ans: होय, पण कॅमेरा इंडिकेटर, डेटा परमिशन्स आणि प्रायव्हसी सेटिंग्स तपासणे खूप महत्त्वाचे आहे.