Airtel कडून नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची घोषणा, 189 देशांमध्ये मिळणार अमर्यादित डेटा आणि बरंच काही...
भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली आहे. या नवीन प्लॅन्समुळे ग्राहकांना अधिक चांगल्या नेटवर्कचा आनंद घेता येणार आहे. भारती एअरटेलने आपल्या आयआर पोर्टफोलिओमध्ये नवीन प्लॅन्स अॅड केले आहेत. या प्लॅन्समुळे ग्राहकांना अधिक चांगल्या नेटवर्कचा अनुभव घेता येणार आहे. हे नवीन प्लॅन्स अधिक परवडणारे असतील, ज्यामुळे ग्राहकांचा त्रास देखील कमी होणार आहे. कंपनीने 189 देशांमध्ये अमर्यादित डेटा ऑफर करणारे भारताचे पहिले अमर्यादित आयआर प्लॅन्स सादर केले आहेत.
याव्यतिरिक्त, दीर्घकाळ चालणाऱ्या एनआरआय समुदायासाठी एअरटेलने एक वर्षाची वैधता असलेला 4000 रुपयंचा एक अनोखा रिचार्ज प्लॅनसुद्धा लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये परदेशात असल्यावर ग्राहकांना 5 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. यासोबतच 100 व्हॉईस मिनिटे मिळतात, तर भारतात असलेल्या ग्राहकांना हाच प्लॅन वापरुन दररोज 1.5 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉल्सचे लाभ मिळविता येतात. हा प्लॅन ग्राहकांना 189 देशांमध्ये कुठेही विनाअडथळा कनेक्टिव्हिटीचा अनुभव देत आहे. शिवाय ग्राहकांना प्रत्येक देशात वापरलेला एअरटेलचा तो नंबर भारतात असताना देखील वापरता येणार असून त्यासाठी वेगळा रिचार्ज करावा लागणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
सिद्धार्थ शर्मा, डायरेक्टर मार्केटिंग आणि सी.ई.ओ – कनेक्टेड होम्स, भारती एअरटेल म्हणाले, “एअरटेल येथे आमच्या ग्राहकांचे जीवन सोपे करण्याचे आणि त्यांना अधिक मूल्य आणि सुविधा देण्याचे समर्पण आम्ही हाती घेतलेले आहे. आम्ही खरोखरच ग्राहकांसाठी आमच्या मूल्य प्रस्तावाची पुनर्व्याख्या करणारे आणि त्यांना जगभरात फिरताना डेटा आणि व्हॉईस उदारपणे वापरण्याचे स्वातंत्र्य देणारे आयआर प्लॅन्स नाट्यमय पद्धतीने सुलभ केलेले आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करणारे समाधान सतत देण्याची बांधिलकी स्वीकारलेली आहे.”