
तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल... आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट
Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
ॲमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलदरम्यान डिस्काऊंट किंमतीत मिळणाऱ्या हँडसेट्सना टिझ करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आयफोन 16, सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा, वनप्लस 15आर, आयकू 15आर, वनप्लस 13एस, व्हिवो एक्स300 एफई, शाओमी 17, ओप्पो रेनो 16 आणि इत्यादींचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2026 साठी डेडिकेटेड माइक्रोसाइट अपडेट करण्यात आली आहे. या मायक्रोसाईटवर अशा स्मार्टफोन्सचा खुलासा करण्यात आला आहे, जे सेलदरम्यान कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. माइक्रोसाईटवरून अशी माहिती मिळत आहे की, ‘अल्ट्रा प्रीमियम’ कॅटेगरीमधील आयफोन 16, सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा, वनप्लस 15आर, आयकू 15आर, शाओमी 17, व्हिवो एक्स300 एफई, वनप्लस 15, ओप्पो रेनो 16, वनप्लस 13एस आणि सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 7 सेलमध्ये अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
तसेच, ॲमेझॉनच्या आगामी सेलमध्ये प्रिमियम कॅटेगरीमधील वनप्लस नॉर्ड सीई 6, सॅमसंग गॅलेक्सी ए56, आयक्यूओ झेड11, वनप्लस नॉर्ड 6, ओप्पो रेनो 15, रेडमी टर्बो 5, टेक्नो कॅमोन 50 अल्ट्रा, ओप्पो रेनो 16सी, व्हिवो एस2 आणि रेडमी नोट 15 प्रो प्लस या स्मार्टफोन्स मॉडेल्सवर देखील मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.
वनप्लस नॉर्ड सीई 6 लाइट, सॅमसंग गॅलेक्सी एम47, आयक्यूओ झेड11एक्सए, रेडमी नोट 17, वनप्लस एन6, रियलमी नार्झो 100एक्स 5जी, सॅमसंग गॅलेक्सी ए17, रेडमी नोट 15, आयक्यूओ झेड11एक्स आणि ओप्पो ए 6 एक्स 5G सारखे मिड-रेंज स्मार्टफोन्स देखील सेलमध्ये मोठ्या डिस्काऊंटसह खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम 17ई, वनप्लस एन6 एक्स, रेडमी 15 सी, आयक्यू झेड 11 लाइट, सॅमसंग गॅलेक्सी एम 17 5G सह इत्यादी पर्याय उपलब्ध असणार आहेत. तसेच, स्मार्टफोन्स आणि विविध प्रोडक्ट्सच्या खरेदीवर बँक डिस्काऊंट देखील ऑफर केले जाण्याची शक्यता आहे.