Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
ओप्पो स्मार्टफोन्सच्या नवीन किंमतींबाबत एक टिप्स्टरने माहिती शेअर केली आहे. रेनो 16 सी आणि ए 6 5G च्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे, तर A6c च्या दोन्ही व्हेरिअंट्समध्ये 1 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. स्मार्टफोन्सच्या सततच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने भारतात Oppo Reno 16c च्या किंमतीत 4 हजार रुपयांपर्यंत वाढ केली असल्याचे सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य: Oppo)
ओप्पो रेनो 16 सी च्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 52,999 रुपये झाली आहे. तर या व्हेरिअंटची किंमत यापूर्वी 49,999 रुपये होती. तसेच, स्मार्टफोनचे 8GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 53,999 रुपयांऐवजी 57,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत आता 59,999 रुपयांऐवजी 62,999 रुपये झाली आहे.
ओप्पो ए 6 5G स्मार्टफोनच्या 3 व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपयांऐवजी 29,999 रुपये झाली आहे. तर 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये झाली आहे. 6GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 31,999 रुपयांऐवजी 35,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
ओप्पो ए 6 एक्स 5G चे 4GB + 64GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 18,999 रुपयांऐवजी 19,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 4GB + 128GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 21,999 रुपयांऐवजी 23,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये झाली आहे. ही किंमत पूर्वी 24,999 रुपये होती.
ओप्पो ए 6 सी च्या दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत 1 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये झाली आहे.






