Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर

WhatsApp New Update: व्हॉट्सॲपने पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या ईव्हेंट फीचर्ससाठी नवीन अपग्रेड जारी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता व्हॉट्सॲप अकाऊंट नसलेल्या यूजर्सना देखील आमंत्रण पाठवले जाऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2026 | 08:59 AM
WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर

Follow Us
Follow Us:
  • ईव्हेंट फीचर अधिक अपग्रेड करण्याचा निर्णय
  • व्हॉट्सॲप अकाऊंट नसलेल्या यूजर्ससोबत देखील शेअर करू शकता ईव्हेंटची लिंक
  • एका ब्लॉग पोस्टमध्ये मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने केली घोषणा
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने मे 2024 मध्ये कम्युनिटीजसाठी ईव्हेंट्स क्रिएट करणं आणि सदस्यांना आमंत्रण पाठवण्यासाठी एक फीचर सादर केले होते. यानंतर हे फीचर ग्रुप चॅटसाठी देखील सादर करण्यात आले. ज्यामध्ये इतर यूजर्सना पर्याय देण्यात आला होता की, ते मार्क करू शकतात की, ते ईव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात की नाही. आता कंपनीने त्यांचे ईव्हेंट फीचर अधिक अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. या फीचरसाठी नवीन अपडेट सादर केले जाणार आहे. नवीन अपडेटमध्ये इव्हेंटच्या लिंक्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट नाही, अशा लोकांसोबत देखील यूजर्स ईव्हेंटची लिंक शेअर करू शकणार आहेत.

Vi ची AI क्षेत्रात मोठी झेप! ‘Vi Intelligence’ उपक्रमाची घोषणा; ग्राहकांसह उद्योगांचाही अनुभव बदलणार

व्हॉट्सॲप ईव्हेंट फीचरसाठी अपग्रेड्स रोलआऊट

नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने घोषणा केली आहे की, व्हॉट्सॲप ईव्हेंट फीचरसाठी अनेक अपग्रेड्स रोलआऊट केले जात आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, येत्या काही आठवड्यांमध्ये नवीन फीचर सर्वांसाठी रोलआऊट केले जाणार आहेत. या नव्या फीचरमध्ये यूजर्सना अशा लोकांसोबत ईव्हेंटची लिंक शेअर करण्याचा पर्याय मिळणार आहे, ज्यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट नाही. हे फीचर काही प्रमाणात व्हॉट्सॲप गेस्ट कॉल फंक्शनॅलिटीप्रमाणे आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

यूजर्स आता ईव्हेंट क्रिएट करू शकतात. त्या ईव्हेंटसाठी कव्हर फोटो जोडू शकतात आणि या ईव्हेंटची लिंक थेट दुसऱ्या लोकांसोबत शेअर केली जाऊ शकते. RSVP स्टेटसमध्ये म्हणजेच आमंत्रण देण्यात आलेला व्यक्ती ईव्हेंट अटेंड करणार आहे की नाही हे यूजरना समजणार आहे. आमंत्रित सदस्यांना कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती (RSVP) कळवण्यासाठी ॲप डाउनलोड करण्याची किंवा व्हॉट्सॲप अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही.

यूजर्सच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! अनोख्या डिझाईनसह Motorola Signature 27 ची दमदार एंट्री; फीचर्स पाहताच म्हणाल, कमालच…..

यूजर्सना मिळणार RSVPs मॅनेज करण्याची सुविधा

याव्यतिरिक्त, व्हॉट्सॲपने एक नवीन ‘इव्हेंट्स होम’ सादर केले आहे, जे एका मध्यवर्ती केंद्र (सेंट्रलाइज्ड हब) म्हणून काम करते. कंपनी याला यूजर्ससाठी एक ‘वन-स्टॉप’ उपाय म्हणून सादर करत आहे, ज्याद्वारे ते इतरांना पाठवण्यासाठी कस्टमाइज्ड आमंत्रणे तयार करू शकतात. याशिवाय व्हॉट्सॲप ईव्हेंट्स होम यूजर्सना RSVPs मॅनेज करण्याची सुविधा देते. ते कस्टम रिमाइंडर्स सेट करू शकतात आणि एक प्लस-वन देखील जोडू शकतात. यूजर्स व्हॉट्सॲप सेटिंग पेजमध्ये जाऊन ईव्हेंट पर्याय निवडून भूतकाळातील आणि आगामी ईव्हेंट्सची माहिती मिळवू शकतात. या यादीमध्ये यूजर्सनी क्रिएट केलेल्या ईव्हेंट्ससोबतच त्यांना आमंत्रित करण्यात आलेल्या ईव्हेंट्सचा देखील समावेश असणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हॉट्सॲप ईव्हेंट्स फीचर म्हणजे काय?

    Ans: व्हॉट्सॲप ईव्हेंट्स फीचरच्या मदतीने यूजर्स ग्रुप किंवा कम्युनिटीमध्ये कार्यक्रम तयार करू शकतात आणि इतर सदस्यांना आमंत्रण पाठवू शकतात.

  • Que: व्हॉट्सॲपवर आता अकाउंट नसलेल्या व्यक्तींनाही इव्हेंटची लिंक पाठवता येणार आहे का?

    Ans: होय, नवीन अपडेटनुसार व्हॉट्सॲप अकाउंट नसलेल्या व्यक्तींसोबतही इव्हेंटची लिंक शेअर करता येणार आहे.

  • Que: व्हॉट्सॲप ईव्हेंट्स मध्ये कोणते नवीन फीचर्स मिळणार आहेत?

    Ans: इव्हेंट लिंक शेअर करणे, कव्हर फोटो जोडणे, RSVP स्टेटस पाहणे, कस्टम रिमाइंडर्स सेट करणे आणि Plus-One जोडणे अशा सुविधा मिळणार आहेत.

Web Title: Whatsapp new update share event invitations with non whatsapp users hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Vi ची AI क्षेत्रात मोठी झेप! ‘Vi Intelligence’ उपक्रमाची घोषणा; ग्राहकांसह उद्योगांचाही अनुभव बदलणार
1

Vi ची AI क्षेत्रात मोठी झेप! ‘Vi Intelligence’ उपक्रमाची घोषणा; ग्राहकांसह उद्योगांचाही अनुभव बदलणार

Tech Tips: वारंवार डिस्कनेक्ट होतंय ब्लूटूथ? ‘या’ कारणांमुळे येऊ शकते समस्या
2

Tech Tips: वारंवार डिस्कनेक्ट होतंय ब्लूटूथ? ‘या’ कारणांमुळे येऊ शकते समस्या

India Transport Sector: ट्रक वाहतुकीला अच्छे दिन! दुचाकी, कार अन् बांधकाम उपकरणांच्या विक्रीत वाढ
3

India Transport Sector: ट्रक वाहतुकीला अच्छे दिन! दुचाकी, कार अन् बांधकाम उपकरणांच्या विक्रीत वाढ

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!
4

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.