
स्मार्टवॉच नाही, तर थेट मेंदूवर लक्ष ठेवणारं गॅजेट! नव्या 'Temple' ची सर्वत्र चर्चा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
टेंपल कोणतेही सामान्य स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड नाही. मेंदूतील ब्लड फ्लो आणि त्यासंबंधित सिग्नल ट्रॅक करण्यासाठी हे गॅझेट डिझाईन करण्यात आले आहे. हे डिव्हाईस डोक्याच्या एका बाजूला, कपाळावर किंवा कानाच्या मध्यभागी लावले जाते. यामध्ये ऑप्टिकल सेंसर देण्यात आले आहेत, जे मेंदूमध्ये होणाऱ्या रक्ताच्या प्रवाहातील बदल ट्रॅक करते. या तंत्रज्ञानाला कंपनीने BrainFlow असं नावं दिलं आहे. (फोटो सौजन्य: Temple)
दीपिंदर गोयल यांनी सादर केलेल्या नव्या टेंपल डिव्हाईसमध्ये एन्ट्रॉपी स्कोअर नावाचे एक फीचर देखील मिळणार आहे. इथे 1 ते 250 दरम्यान गुण दिले जाणार आहेत. या गुणांच्या मदतीने यूजर्स त्यांच्या शरीरावरील तणाव समजू शकणार आहेत. यामध्ये झोप, व्यायाम, ताण आणि कॅफीन सारख्या विविध गोष्टींचा परिणाम देखील समाविष्ट असू शकतो. टेंपल डोक्यावर लावण्यासाठी कोणत्याही स्ट्रॅपची आवश्यकता नाही. हे डिव्हाईस ग्रिप्स नावाच्या एका विशेष चिकट टेपचा वापर करून लावले जाते. कंपनीने सांगितलं आहे की, हे डिव्हाईस धावताना, पोहताना आणि अंघोळ करताना देखील लावू शकता. चश्मा घालणाऱ्या लोकांसाठी देखील
टेंपलची किंमत भारतात 85,000 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये लाइफटाइम सब्सक्रिप्शन पर्याय देखील आहे. भारतात या डिव्हाईसची प्री ऑर्डर सुरु झाली आहे. यूजर ‘टेंपल’ ॲपला भेट देऊन किंवा अधिकृत वेबसाइट temple.com वर जाऊन गॅझेट बुक करू शकतात. कंपनीने सांगितलं आहे की, प्रत्येक डिव्हाईस ऑर्डर मिळाल्यानंतर तयार केले जाणार आहे. यामुळे बुक केल्यानंतर डिलीव्हर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. विशेष म्हणजेच डिव्हाईस शिप होण्यापूर्वी यूजर रिफंडसाठी विनंती देखील करू शकतात.
ट्रू गोल्ड, रोझ गोल्ड, ब्लॅक मिरर, रिअल जेड, डीप ब्लू आणि पर्पल फंक या सहा रंगांच्या पर्यायांत डिव्हाईस खरेदीसाठी उपलब्ध आहे. लक्षात ठेवा की ‘टेम्पल’ हे वैद्यकीय निदानाचे साधन किंवा आजार शोधण्याचे डिव्हाईस म्हणून वापरण्यासाठी बनवलेले नाही. हे उपकरण आरोग्य (वेलनेस) आणि संशोधनाच्या उद्देशासाठी डिझाइन केलेले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे स्मार्टवॉचपेक्षा वेगळ्या प्रकारचे उपकरण आहे; त्यामुळे, ते खरेदी करण्यापूर्वी त्याच्या वैशिष्ट्यांची आणि वापराच्या उद्देशाची पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे.
Ans: Temple हे एक खास वेलनेस गॅझेट आहे. मेंदूतील रक्तप्रवाह आणि त्याच्याशी संबंधित सिग्नल ट्रॅक करण्यासाठी हे डिव्हाइस तयार करण्यात आले आहे.
Ans: भारतात Temple डिव्हाइसची किंमत ८५,००० रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये लाइफटाइम सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे.
Ans: यामध्ये ऑप्टिकल सेन्सर्स देण्यात आले आहेत. हे सेन्सर्स मेंदूतील रक्तप्रवाहातील बदल ट्रॅक करतात. कंपनीने या तंत्रज्ञानाला BrainFlow असे नाव दिले आहे.