Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Claude 3.7 Sonnet: AI च्या शर्यतीत आता Amazon ची एंट्री, OpenAI आणि DeepSeek ला टक्कर देण्यासाठी तयार केलं अनोखं मॉडेल

Anthropic ने डेव्हलपर्ससाठी एक AI एजंटिक टूल - Claude Code देखील लाँच केले आहे. हे कंपनीचे पहिले AI एजंट टूल आहे. रिझनिंग मॉडेल अ‍ॅडव्हान्स्ड लँग्वेज मॉडेल (एलएलएम) हे Claude 3.7 Sonnet चे एक नवीन वैशिष्ट्य आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2025 | 12:06 PM
Claude 3.7 Sonnet: AI च्या शर्यतीत आता Amazon ची एंट्री, OpenAI आणि DeepSeek ला टक्कर देण्यासाठी तयार केलं अनोखं मॉडेल

Claude 3.7 Sonnet: AI च्या शर्यतीत आता Amazon ची एंट्री, OpenAI आणि DeepSeek ला टक्कर देण्यासाठी तयार केलं अनोखं मॉडेल

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला आठवतय का काही दिवसांपूर्वी चीनचे AI मॉडेल डिपसिकने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. डिपसिकने OpenAI च्या AI चॅटबोट चॅटजीपीटीला मागे टाकलं होतं. या दोन्ही मॉडेलसमध्ये कडाक्याची टक्कर सुरु होती. OpenAI आणि डीपसिकची ही शर्यत सुरु असतानाच आता आणखी एका नव्या AI मॉडेलने या शर्यतीत उडी घेतली आहे. आता अ‍ॅमेझॉनने Claude 3.7 Sonnet नावाचं एक AI मॉडेल लाँच केलं आहे.

स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवायला येतेय Infinix Note 50 सिरीज, AI फीचर्स सपोर्टसह या दिवशी करणार एंट्री

Amazon ची गुंतवणुक AI कंपनी Anthropic ने त्यांचे नवीनतम लेटेस्ट लँग्वेज मॉडल Claude 3.7 Sonnet लाँच केले आहे. हे AI मॉडेल ChatGPT, DeepSeek आणि Grok सारख्या मोठ्या मॉडेल्सना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. यासोबतच, कंपनीने डेव्हलपर्ससाठी क्लाउड कोड हे नवीन टूल देखील सादर केले आहे. हे नवीन टूल म्हणजे कंपनीने AI एजंटच्या शर्यतीत टाकलेले पहिले पाऊल म्हटलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Claude 3.7 Sonnet ची खास वैशिष्ट्ये?

या AI मॉडेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे रिजनिंग मोड – Extended Thinking Mode – Anthropic आहे. याने Pre-Trained आणि Independent Reasoning Models च्या पूर्वीच्या संकल्पनेची जागा घेतली आहे. आता युजर्स थेट Claude ला सखोल विचार (Extended Thinking Mode) करण्यास सांगू शकतात. यामुळे मॉडेलला गणित, भौतिकशास्त्र, कोडिंग आणि सूचना चांगल्या प्रकारे समजतील.

कंपनीचे म्हणणे आहे की Claude 3.7 Sonnet हे ओपनएआयच्या o-3 Mini (हाय) आणि DeepSeek R1 सारख्या स्पर्धकांपेक्षा अधिक अचूक आणि शक्तिशाली आहे. हे AI मॉडेल मोफत आणि सशुल्क सबस्क्रिप्शनवर उपलब्ध असेल. फ्री यूजर्स केवळ Claude 3.7 Sonnet च्या प्री-ट्रेंड मॉडलचा वापर करण्यास सक्षम असणार आहेत. तर पेड यूजर्स त्याच्या एक्सटेंडेड थिंकिंग मोडमध्ये प्रवेश करू शकतील. यासोबतच, ते त्याच्या इतर प्रगत वैशिष्ट्यांचा देखील वापर करू शकतील.

रीजनिंग मॉडल खास का आहे?

रिझनिंग मॉडेल अ‍ॅडव्हान्स्ड लँग्वेज मॉडेल (एलएलएम) हे Claude 3.7 Sonnet चे एक नवीन वैशिष्ट्य आहे, जे सर्वात जटिल समस्या सोडवण्यासाठी आणि मानवासारखी विचारसरणी विकसित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पहिले रिझनिंग मॉडेल ओपनएआयने सप्टेंबर 2024 मध्ये o1 या नावाने प्रसिद्ध केले. यानंतर, गुगल, डीपसीक आणि एलोन मस्कच्या ग्रोक सारख्या मोठ्या AI कंपन्यांनी त्यांचे रीजनिंग मॉडेल सादर केले. Anthropic चा दावा आहे की त्यांचे रीजनिंग मॉडेल गणित आणि संगणक विज्ञानापेक्षा वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

पहिले AI एजंट टूल – Claude Code

Anthropic ने डेव्हलपर्ससाठी एक AI एजंटिक टूल – Claude Code देखील लाँच केले आहे. हे कंपनीचे पहिले AI एजंट टूल आहे. हे कंपनीचे कमांड-लाइन टूल आहे, ज्याच्या मदतीने डेव्हलपर्स त्यांच्या टर्मिनलवरून थेट AI ची मदत घेऊ शकतात. हे टूल गिटहब एक्सटेंशनद्वारे वापरले जाऊ शकते. हे डेव्हलपर्सना कोडिंगमध्ये मदत करण्यासाठी खास डिझाईन करण्यात आले आहे.

Apple iOS Update: Apple च्या नवीन अपडेटमध्ये मिळालं Priority Notifications आणि अनेक कमाल AI फीचर्स, अशी करा सेटिंग

कंपन्या AI इंडस्ट्रीमध्ये उतरण्याच्या तयारीत

या वर्षाच्या सुरुवातीला, चिनी AI स्टार्टअप कंपनी डीपसीकने त्यांचे पहिले एआय मॉडेल DeepSeek-R1 लाँच करून AI इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवून दिली. या AI मॉडेलची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती फक्त 6 मिलियन डॉलर्समध्ये विकसित करण्यात आली. दुसरीकडे, OpenAI आणि Meta सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी AI मॉडेल्सवर अब्जावधी डॉलर्स खर्च केले होते. DeepSeek R1 लाँच झाल्यानंतर, AI कंपन्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Amazon launched new ai model claude 37 sonnet to compete with openai and deepseek tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • AI technology
  • amazon
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.