Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Android 16 च्या डिझाईनमध्ये झाला बदल, मोबाइल स्क्रीन आणि फीचर्स वापरताना आता युजर्सना मिळणार नवा अनुभव

आता अँड्रॉईड युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. यासाठी कंपनी एक नवीन अपडेट देखील जारी करणार आहे. हे अपडेट सादर करण्यासाठी कंपनी एक नवीन ईव्हेंट आयोजित करणार आहे. याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2025 | 12:05 PM
Android 16 च्या डिझाईनमध्ये झाला बदल, मोबाइल स्क्रीन आणि फीचर्स वापरताना आता युजर्सना मिळणार नवा अनुभव

Android 16 च्या डिझाईनमध्ये झाला बदल, मोबाइल स्क्रीन आणि फीचर्स वापरताना आता युजर्सना मिळणार नवा अनुभव

Follow Us
Close
Follow Us:

सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या स्मार्टफोनचा लूक बदलणार आहे. फक्त लूकच नाही तर युजर्सचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव देखील बदलणार आहे. याचं कारण म्हणजे आता Google लवकरच Android 16 नावाचे नवीन मोबाइल सिस्टम अपडेट घेऊन येणार आहे. यामुळे आता खूप मोठा बदल होणार आहे. Android 16 मुळे मोबाईलची स्क्रीन आणि फीचर्स दोन्हींंमध्ये मोठे बदल होणार आहेत.

Asus चे दोन नवीन लॅपटॉप भारतात लाँच, टच स्क्रीन डिस्प्ले आणि अनोख्या फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

या नवीन अपडेटनंतर लॉक स्क्रीनवर नवीन विजेट (घड्याळ, हवामानअपडेट, कॅलेंडर) पाहायला मिळायला येणार आहे. मोबाइलच्या वरच्या लाइनवर, म्हणजेच स्टेटस बार आणि फास्ट सेटिंग्सवाला पॅनल देखील आता नवीन आणि सुटसुटीत दिसणार आहे. बॅटरी आणि चार्जिंगचा आयकॉन आता iPhone प्रमणे दिसणार आहे, जो पाहताना पूर्वीपेक्षा अधिक चांगला वाटणार आहे. Google या नवीन Android 16 ला 13 मे रोजी एका खास ईव्हेंटमध्ये सादर करणार आहे, जिथे अनेकांना या नवीन अपडेटची झलक पाहायला मिळणार आहे. हे नवीन अपडेट सर्व युजर्ससाठी कधी रोलआऊट केलं जाणार याबाबत अद्याप माहिती नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

नवीन स्टेटस बार आणि क्विक सेटिंग पॅनल

Android 16 मध्ये स्टेटस बारचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. आता 5G चं निशान पूर्वीपेक्षा अधिक मोठं आणि साफ दिसणार आहे. घड्याळ आता मोबाइल स्क्रीनच्या डावीकडे मोठ्या आकारात दिसणार आहे. क्विक सेटिंग्समध्ये देखील अनेक बदल केले जाणार आहेत. आता Wi-Fi आणि ब्लूटूथ एकाच ठिकाणाहून कंट्रोल केलं जाणार आहे. याशिवाय एक नवीन टाइल एडिटर देखील पाहायला मिळणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही शॉर्टकट बटन (टाइल्स) ला तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. टाइल्सचा आकार देखील बदलू शकतो. स्क्रीनचा ब्राईटनेस देखील कमी किंवा जास्त करण्यासाठी ब्राइटनेस स्लाइडर एका नव्या डिझाईनमध्ये सादर केलं जाणार आहे.

इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही… ‘हे’ आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes

UI मध्ये मिळणार अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. Google आता त्याच्या मोबाईल सिस्टममध्ये आणखी एक मोठा बदल करणार आहे. अ‍ॅप ड्रॉअर, पिन टाकणारी स्क्रीन आणि अलीकडेच उघडलेल्या अ‍ॅप्स मेनूमध्ये थोडीशी अस्पष्ट पार्श्वभूमी दिसेल, ज्यामुळे स्क्रीन अधिक सुंदर दिसेल. आता टाईमच्या खाली तारीख आणि हवामान अपडेट देखील मिळणार आहे. याशिवाय एक छोटा नोटिफिकेशन बटन देखील मिळणार आहे, जो लॉक स्क्रीनवर अनेक नोटिफिकेशन एकाच ठिकाणी दाखवणार आहे.

आता अँड्रॉइड 16 मध्ये, व्हॉल्यूम वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी स्लायडर देखील नवीन आणि अधिक स्टायलिश दिसेल. पूर्वीच्या जाड गोळीसारख्या आकाराऐवजी, आता त्यात एक सडपातळ आणि सुंदर डिझाइन असेल, जे गुगलच्या नवीन Material Design 3 नुसार आहे. संगीत किंवा व्हिडिओ प्ले करताना डिव्हाइस बदलण्याच्या पर्यायातही बदल करण्यात आले आहेत. आता ‘कनेक्ट अ डिव्हाइस’ बटण वरती दिसेल आणि ते पूर्वीपेक्षा लहान असेल.

Web Title: Android 16 design will change users will get new experience foe mobile screen and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Android
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.