इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही... 'हे' आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes
फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्यांसाठी आजचे म्हणजेच 23 एप्रिल 2025 चे रिडीम कोड जारी करण्यात आले आहेत. या कोडसह पेट्स, इमोट आणि कॅरेक्टरसह अनेक धमाकेदार रिवॉर्ड मिळवता येतात. हे रिडीम करण्यासाठी, डायमंड वापरण्याची किंवा कोणत्याही प्रकारचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. हे विशेष गेमिंग कोड पूर्णपणे मोफत आहेत आणि कोणीही हे कोड रिडीम करू शकते.
Vivo ने उडवली इतर कंपन्यांची झोप! स्वस्त किंमतीत लाँच केला पॉवरफुल Smartphone, असे आहेत खास फिचर्स
फ्री फायर मॅक्स रिडीम कोड पहिल्या 500 गेमर्ससाठी उपलब्ध आहेत. या रिडीम कोडची संख्या 16 अंकांपर्यंत असते आणि ती संख्या आणि अक्षरे मिसळून बनवली जातात. जर तुम्हाला आजच्या कोडमधून धमाकेदार रिवॉर्ड मिळवायची असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या रिडीम कोडचा वापर करू शकता. हे फ्री फायर मॅक्स रिडीम कोड मर्यादित काळासाठी वैध आहेत आणि वेळ संपल्यानंतर आपोआप कालबाह्य होतात. या कारणास्तव, शक्य तितक्या लवकर कोड रिडीम करणे उचित आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्स गेमर्ससाठी नवीन फेडेड व्हील इव्हेंट बॅटल रॉयल गेममध्ये लाईव्ह झाला आहे. त्याचे नाव ओव्हर चार्ज्ड आहे. त्यात एक उत्तम इमोट उपलब्ध आहे. याशिवाय, या ईव्हेंटमध्ये स्कायबोर्ड, पेट फूड, वेपन लूट क्रेट आणि ग्रेनेड एक्सप्लोजन इफेक्ट सारखे रिवॉर्ड्स देखील दिली जात आहेत.
फ्री फायर मॅक्सचा ओव्हर चार्ज्ड फेडेड व्हील इव्हेंट सुरू झाला आहे, जो पुढील 15 ते 20 दिवसांसाठी सुरु राहणार आहे. दरम्यान, गेमर्सना या ईव्हेंटमध्ये ओव्हर चार्ज्ड इमोट, क्यूब फ्रॅगमेंट, द एक्झिक्युशनर वेपन लूट क्रेट, स्कायबोर्ड-डीप गॅलेक्सी आणि पेट फूड मिळविण्याची संधी मिळणार आहे. यासह, आर्मर-सप्लाय क्रेट, वेस्टलँड ग्रेनेड, सायन फिअर वेपन लूट क्रेट आणि बॅकपॅक मोफत मिळण्याची संधी आहे.
फ्री फायर मॅक्स इव्हेंटमधून रिवॉर्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला प्रथम दोन आयटम निवडावे लागतील जे तुम्हाला नको आहेत. यानंतर त्या वस्तू रिवॉर्ड यादीतून काढून टाकल्या जातील. नंतर 9 डायमंड खर्च करून स्पिन करावं लागेल. या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल. एकदा ईव्हेंटमध्ये बक्षीस मिळाले की ते पुन्हा मिळू शकत नाही. प्रत्येक स्पिननंतर डायमंडची संख्या वाढेल. याचा अर्थ असा की ईव्हेंटमध्ये बक्षिसे मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक हिरे खर्च करावे लागतील.
iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral