Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Anniversary Sale: 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त ग्राहकांसाठी सेल! या प्रोडक्ट्सवर मिळतंय धमाकेदार डिस्काऊंट

Apple कंपनीने 50 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त एका सेलची घोषणा केली आहे. सेलमध्ये ऑफर्स, डिस्काऊंट आणि कॅशबॅकसह प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2026 | 10:26 AM
Apple Anniversary Sale: 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त ग्राहकांसाठी सेल! या प्रोडक्ट्सवर मिळतंय धमाकेदार डिस्काऊंट

Apple Anniversary Sale: 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त ग्राहकांसाठी सेल! या प्रोडक्ट्सवर मिळतंय धमाकेदार डिस्काऊंट

Follow Us
Follow Us:
  • ॲपलने आपल्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त, इमॅजिन स्टोअरने भारतात मर्यादित कालावधीसाठी सेलची घोषणा केली आहे.
  • आयफोन 17 प्रो मॅक्स 256GB व्हेरिएंटची किंमत 1,49,900 रुपयांवरून 1,02,900 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
  • ॲपल वॉच अल्ट्रा 3, आयपॅड प्रो (M5) आणि इतर प्रीमियम डिव्हाइसेसवर कॅशबॅक + एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने 50 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याच निमित्ताने कंपनीने अ‍ॅपलच्या ऑथराइज्ड रीसेलर ईमॅजिन स्टोअरने भारतात सेलची घोषण केली आहे. आयफोन, आयपॅड आणि अ‍ॅपल वॉच मॉडेल्सवर मर्यादित काळासाठी ऑफर्स उपलब्ध आहे. आयोजित करण्यात आलेल्या या सेलमध्ये क्यूपर्टिनो-बेस्ड या टेक दिग्गज कंपनीने प्रीमियम प्रोडक्ट्सवर इंस्टंट डिस्काऊंट, बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस ऑफर केले आहे. त्यामुळे डिव्हाईसची किंमत प्रचंड कमी झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन 17 प्रो मॅक्स देखील अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान

256GB स्टोरेजवाला आयफोन 17 प्रो मॅक्स आता ग्राहकांना 1,49,900 रुपयाऐवजी केवळ 1,02,900 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या आयफोनच्या खरेदीवर कंपनी रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट आणि 4,000 रुपयांचे बँक कॅशबॅक देत आहे. तसेच 6,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस देखील ऑफर केले जात आहे. काही खास मॉडेल्सवर कंपनी 36,000 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू देखील ऑफर करत आहे. आयफोन 17 प्रो (256GB) देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे. हा आयफोन मॉडेल सेलमध्ये 89,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच या डिव्हाईसच्या खरेदीवर एक्सचेंज आणि कॅशबॅक देखील ऑफर केले जात आहे. कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर इंस्टंट डिस्काउंट ऑफर करत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

तसेच, आयफोन 17 चे 256GB व्हेरिअंट 82,900 रुपयांऐवजी आता केवळ 37,900 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर 512GB व्हेरिअंट 1,02,900 रुपयांना नाही तर 57,900 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. या किमतीच्या तपशिलामध्ये 1,000 रुपयांची त्वरित सूट, 3,000 रुपयांचा बँक कॅशबॅक आणि 35,000 रुपयांपर्यंतच्या विनिमय मूल्यासह 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.

आयफोन एअर देखील या सेलमध्ये अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या आयफोन मॉडेलचे 256GB व्हेरिअंट आता ग्राहकांना 56,900 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. तर 512GB मॉडेल 76,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ऑनलाइन रिटेलरचं असं म्हणणं आहे की, 24 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देखील उपलब्ध आहे. याची सुरुवात 3,413 रुपयांपासून होते. 128 जीबी स्टोरेज असलेल्या आयपॅड (2025) च्या वाय-फाय व्हेरिएंटची किंमत 34,900 रुपये आहे, परंतु तो 31,900 रुपयांच्या प्रभावी किमतीत खरेदी करता येतो. त्याच स्टोरेजच्या वाय-फाय + सेल्युलर मॉडेलची किंमत 49,900 रुपयांवरून कमी करून 46,900 रुपये करण्यात आली आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने सादर केला नवा सिल्वर जुबली प्लॅन… केवळ 225 रुपयांत मिळणार डेली 2.5GB डेटा आणि बरंच काही

तसेच iPad Pro (M5) लाइनअपचे 11-इंच (256GB, Wi-Fi) मॉडेल 94,900 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर 13-इंच व्हेरिअंट 1,24,900 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. अ‍ॅपल वॉच अल्ट्रा 3 आता 89,900 रुपयांऐवजी 84,400 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या डिस्काऊंट ऑफरमध्ये 2,500 रुपयांची त्वरित सूट आणि 3,000 रुपयांचा बँक कॅशबॅक समाविष्ट आहे. या मालिकेतील इतर मॉडेल्सवरही सवलत उपलब्ध आहे. या ऑफरनंतर, ॲपल वॉच सिरीज 11 43,400 रुपयांमध्ये आणि ॲपल वॉच SE 3 केवळ 22,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: Apple anniversary sale 2026 on the occasion of 50 years completion users will get huge discount on apple products tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची ‘ही’ असू शकतात कारणं, घरबसल्या करा ‘हे’ उपाय
1

Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची ‘ही’ असू शकतात कारणं, घरबसल्या करा ‘हे’ उपाय

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर
2

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
3

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
4

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.